म्हणून सायली संजीवला अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगीच समजतात चाहते, वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:59 IST2021-06-04T14:59:08+5:302021-06-04T14:59:41+5:30

आजही सायली संजीवला चाहते गौरी म्हणूनच जास्त ओळखतात. मुळात हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत मालिकेत संवाद होते.

For This Reason Fans Think Actress Sayali Sanjeev Is Daughter Of Ashok Saraf & Nidvedita Saraf | म्हणून सायली संजीवला अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगीच समजतात चाहते, वाचा कारण

म्हणून सायली संजीवला अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगीच समजतात चाहते, वाचा कारण

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. मालिकेत सायली संजीवने साकारलेली गौरी या भूमिकेला तर रसिकांनी प्रचंड पसंती दिली होती. आजही सायली संजीवला चाहते गौरी म्हणूनच जास्त ओळखतात. मुळात हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत मालिकेत संवाद होते.

 

 

मालिकेनंतर सायली संजीव सिनेमांकडे वळली. अलिकडेच प्रदर्शित झालेले  'झिम्मा' आणि 'बस्ता' या सिनेमात सायली दिसली होती. अजूनही काही सिनेमात ती झळकणार आहे. सायली संजीव अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. 

तिच्याविषयी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो. मुळात जेव्हा जेव्हा चाहते सायली संजीवला पाहतात तेव्हा ती अभिनेता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचीच मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. अनेकदा तिला याविषयीचे प्रश्न विचारले जातात. एका मुलाखतीत तिला एका चाहत्याने ती अशोक सराफ आणि निवेदिता यांची मुलगी आहे का ? असा प्रश्न विचारला. त्यावेळी तिनेही असे तुम्ही समजु शकता असे उत्तर दिले. 

अशोक मामा आणि निवेदिता ताई मला मुलीप्रमाणे समजतात. मुळात माझा चेहरा हा काहीसा निवेदिता ताईसारखाच दिसतो. त्यामुळे अनेकांना मी त्यांचीच मुलगी असल्याचे वाटते.  माझ्या वडिलांचे नाव संजीव चंद्रशेखर आणि आईचे नाव शुभांगी चंद्रशेखर आहे असे सांगत तिने चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले होते.

सायली फिटनेसवर बरंच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते. योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे प्रोजेक्टस, फोटो व्हिडीओ सगळ्याच गोष्टींची माहिती तो चाहत्यांसह शेअर करत असेत. सोशल मीडियावर सायली संजीवच्या फॉओअर्सची संख्याही प्रचंड मोठी आहे. 

Web Title: For This Reason Fans Think Actress Sayali Sanjeev Is Daughter Of Ashok Saraf & Nidvedita Saraf