'या' कारणामुळे पुण्याला म्हणतात विद्येचे माहेर घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 14:58 IST2016-11-15T14:06:11+5:302016-11-29T14:58:54+5:30

      प्रसिद्ध संगीतकार विश्वजीत जोशी यांच्या अविश आर्ट हबचे उद्धाटन प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते करण्यात ...

The reason for this 'cause' is called Maaree Maareea of ​​Bidya | 'या' कारणामुळे पुण्याला म्हणतात विद्येचे माहेर घर

'या' कारणामुळे पुण्याला म्हणतात विद्येचे माहेर घर

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">      प्रसिद्ध संगीतकार विश्वजीत जोशी यांच्या अविश आर्ट हबचे उद्धाटन प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्याच्या स्पर्धेच्या जगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अविश आर्ट हब हा उत्तम पर्याय आता पुणेकरांसाठी निर्माण झाला आहे. पुण्याचे हार्ट ऑफ द सिटी मानल्या गेलेल्या फर्ग्युसन रोडवर ‘अविश पर्फोरमिंग आर्टस एण्ड लाईफस्टाईल हब’ सुरु झाले आहे. विविध कलांचा प्रसार आणि व्यक्तिमत्त्व विकास हा अकादमीचा मूऴ उद्देश आहे.
 
या वेळी बोलताना विश्वजीत जोशी यांनी सांगितले की प्रत्येकामध्ये एखादी कला दडलेली असते. मात्र रोजच्या रुटीनमध्ये आपण स्वत:ला विसरुन जातो. या कलांना पुन्हा पुनरुज्जीवन देण्याच्या उद्देशाने अविश आर्ट हब सुरु करण्यात आली आहे. कलेला वयाचं बंधन नसतं. त्यामुळे कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अविश आर्ट हबमध्ये कलांचा आस्वाद घेऊ शकते, असं अविशचे सर्वेसर्वा संदीप बिरादार यांनी सांगितलं.
 
गायिका बेला शेंडेने सांगितलं की सर्व कला एकाच छताखाली सुरू करणारी अविश ही पुण्यातील अनोखी संस्था आहे. प्रत्येक कलेतल्या दिग्गजांचे मार्गदर्शन इथल्या विद्यार्थ्यांना लाभणार असल्यामुळे अविश अकादमीतर्फे अनेक कलांचा प्रसार होणार असल्याचं बेला शेंडे यांनी नमूद केलं. 
 
अविश आर्ट हब ही अनोखी संस्था असून यात तुम्हाला प्रत्येक कलेविषयीचे ज्ञान मिळू शकणार आहे. नृत्य, शास्त्रीय नृत्य, पाश्चात्य नृत्य तसेच झुंबासारख्या फिटनेस नृत्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर संगीतातल्या विविध बाजूंविषयीचे ज्ञान इथे मिळणार आहे. तसेच याठिकाणी मेडिटेशन, रेकी, म्युझिक थेरपी, देखील शिकवली जाणार आहे.

Web Title: The reason for this 'cause' is called Maaree Maareea of ​​Bidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.