"बॅकस्टेज सांभाळणार मला भेटायला आला अन्..."; संकर्षणने सांगितलेला विलक्षण किस्सा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:00 PM2024-04-02T21:00:04+5:302024-04-02T21:00:04+5:30

संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या नाटकात बॅकस्टेज सांभाळणाऱ्या एका मुलाचा विलक्षण किस्सा सांगितला आहे. तुम्हालाही वाचून आनंद होईल

Read the amazing story told by Sankarshan karhade about marathi natak | "बॅकस्टेज सांभाळणार मला भेटायला आला अन्..."; संकर्षणने सांगितलेला विलक्षण किस्सा वाचाच

"बॅकस्टेज सांभाळणार मला भेटायला आला अन्..."; संकर्षणने सांगितलेला विलक्षण किस्सा वाचाच

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणने आजवर विविध माध्यमांत स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. संकर्षण सध्या नाटक , टीव्ही आणि सिनेमा अशा तिनही माध्यमांत मुशाफिरी करत आहे. संकर्षण विविध माध्यमांत कार्यरत असला तरीही त्याने रंगभूमीची कास सोडली नाही. संकर्षणने रंगभूमीवर काम करताना त्याला आलेला विलक्षण अनुभव शेअर केलाय.

संकर्षणने एक फोटो शेअर करुन लिहिलंय की,  "नाटकातला संसार” आज आमच्या तू म्हणशील तसं आणि नियम व अटी लागू नाटकाला बॅकस्टेज चं काम करणारा अक्षय पवार नवा नवा संसार सुरू करून भेटायला आला…. बायकोची ओळख करुन दिली आणि म्हणाला “सोनाली , दादाला नमस्कार कर” ईतकं गोड वाटलं ….
नाटक हे तसं अनिश्चीततेचं माध्यम …. पण नेटाने, चिकाटिने , सातत्याने नाटक केलं तर नाटक खूप काही देतं …."

संकर्षण पुढे लिहितो, "आज बॅकस्टेज करणाऱ्या ह्या मुलाने आयुष्यातलं मोठं पाऊल नाटकाच्या जीवावर ऊचललं …. संसार सुरू केला…. म्हणून प्रत्येक प्रयोग महत्वाचा..
कारण त्या एका एका प्रयोगावर , एका एका कुटुंबाच्या घरी संसार सुरू असतो…. असे अनेक संसार सुखी करण्यासाठी “नाटक” फार फार महत्वाचं ….
ह्या दोघांना खूप शुभेच्छा."

Web Title: Read the amazing story told by Sankarshan karhade about marathi natak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक