रवीने जागवल्या जनार्दन परबांच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 21:05 IST2016-04-11T04:05:15+5:302016-04-10T21:05:15+5:30

जनार्दन परबांच्या मृत्युने मराठी चित्रपटसृष्टी आणखी एका उत्कृष्ट नटाला मुकली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी ...

Ravi wakes up to celebrate Janardan Parab | रवीने जागवल्या जनार्दन परबांच्या आठवणी

रवीने जागवल्या जनार्दन परबांच्या आठवणी

ार्दन परबांच्या मृत्युने मराठी चित्रपटसृष्टी आणखी एका उत्कृष्ट नटाला मुकली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेक कलाकारांनी परबांसोबत काम करताना आलेल्या अनुभव शेअर करून त्यांना श्रद्धांजली दिली. दिग्दर्शक रवी जाधवच्या ‘बँजो’ चित्रपटात परब काम करत होते. 

त्यांच्या आठवणी सांगताना रवी म्हणाला, ‘विश्वासच बसत नाही की, जनार्दन परब आपल्याला सोडून गेले. अगदी 15 दिवसां पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा वरळी व्हिलेज येथे आम्ही त्यांच्यासोबत ‘बँजो’ चित्रपटाची शुटिंग केली. ‘स्टॅच्यु’ चित्रपटातदेखील त्यांची महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट त्यांच्यासाठी आमचा ‘ट्रिब्युट’ आहे.’

मराठी चित्रपटांबरोबरच परबांनी काही हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलेले आहे. ‘क्रांतीवीर’ चित्रपटातील नाना पाटेकरसोबत त्यांचा सीन खूप गाजला होता. नुकतेच ते ‘सिंडरेला’ चित्रपटात दिसले होते.

Web Title: Ravi wakes up to celebrate Janardan Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.