रवी जाधव कोणावर वैतागला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 17:03 IST2016-11-11T17:03:39+5:302016-11-11T17:03:39+5:30

 सध्या राज्यात असो या देशात काहीतरी  भन्नाट घडले तर त्यावर क्षणात विनोदी किस्से फिरण्याची क्रेझच निर्माण झाली आहे. एका ...

Ravi Jadhav wondered whom? | रवी जाधव कोणावर वैतागला ?

रवी जाधव कोणावर वैतागला ?

 
ध्या राज्यात असो या देशात काहीतरी  भन्नाट घडले तर त्यावर क्षणात विनोदी किस्से फिरण्याची क्रेझच निर्माण झाली आहे. एका बाजूला क्षणात काहीतरी परिस्थिती निर्माण होते. तर त्याच्या दुसऱ्याच क्षणी लोकांचे मोबाईलदेखील खणखणायला चालू होतात. काही दिवसांपूर्वी नुकतेच पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी असल्याची घोषणा करताच, दुसऱ्या बाजूला एक से एक विनोदी किस्से सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हॉटसअ‍ॅप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा विविध सोशल मिडीयावर विनोदी किस्से पाहायला मिळत आहेत. सुरूवातीला या विनोदी किस्सेनी लोकांचे प्रचंड मनोरंजन केले आहे. पण आता हेच विनोदी किस्स्यांवर लोक चिडत असल्याचे दिसत आहेत. यामध्ये आता दिग्दर्शक रवी जाधव यांचा देखील समावेश झाला आहे. दिग्दर्शक रवी जाधव हा पाचशे आणि हजारच्या नोटांवर व्हायरल झालेल्या विनोदी किस्सेवर प्रचंड वैतागलेला दिसत आहे. कारण त्याने नुकतेच सोशल मीडियावर ५००-१००० चे तेच तेच जोक्स ५००-१००० वेळा ऐकून आणि पाहून वीट आलाय!!! असे स्टेटस त्याने अपडेट केले आहे. त्याच्या या पोस्टला प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच कमेंन्टदेखील पाहायला मिळत आहेत. काहींनी त्याच्या या विचारांना दुजोरा दिला. तर काहींनी तीच वीट फेकून मारा असे म्हणत मजेशीर कमेंन्टदेखील केलेली पाहायला मिळत आहेत. रवी जाधव यांचा नुकताच पहिला बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॅन्जो असे या चित्रपटाचे नाव होते. तसेच रवीने मराठीमध्ये नटरंग, बालक पालक, बालगंधर्व, टाइमपास असे अनेक सुपरहीट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. 

Web Title: Ravi Jadhav wondered whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.