दिग्दर्शक रवी जाधवने अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांना आजपर्यंत दिले आहेत. नूकत्याच त्याच्या बॅन्जो या पहिल्याच हिंदी चित्रपटाला ...
रवीने केले पहिल्यांदाच डबिंग
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;" /> दिग्दर्शक रवी जाधवने अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांना आजपर्यंत दिले आहेत. नूकत्याच त्याच्या बॅन्जो या पहिल्याच हिंदी चित्रपटाला बॉलिवूडमधुनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता रवी अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून एन्ट्री केल्यानंतर आता त्याने अभिनयातही पदार्पण केले आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबु या चित्रपटात प्रेक्षकांना रवी खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे सध्या डबिंग सुरू आहे. डबिंग करतानाचा एक फोटो रवीने टविटरवर अपलोड केला आहे. त्याबद्दल रवी सांगतोय हे माझे पहिलेच डबिंग आहे. अनेक अभिनेते कालांतराने दिग्दर्शनाकडे वळत असल्याचे आपण पाहिले होते. परंतू दिग्दर्शक अभिनय करणार म्हंटल्यावर त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. रवीने अनेक कलाकारांकडुन अभिनय करून घेतला आहे. आता तो कच्चा लिंबु या चित्रपटात काय कमाल करतोय हे आपल्याला लवकरच दिसेल.