रुपेरी पडद्यावर नेहासोबत ललितची जुळून येणार 'रेशीमगाठी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 17:17 IST2016-11-14T15:29:02+5:302016-11-14T17:17:57+5:30
नेहा महाजन आणि ललित प्रभाकर ही जोडी एका चित्रपटात झळकणार असल्याचे आम्हीच तुम्हाला सांगितले होते. आता ही ...

रुपेरी पडद्यावर नेहासोबत ललितची जुळून येणार 'रेशीमगाठी'
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> नेहा महाजन आणि ललित प्रभाकर ही जोडी एका चित्रपटात झळकणार असल्याचे आम्हीच तुम्हाला सांगितले होते. आता ही जोडी ज्या चित्रपटातून मोठ्या पडदयावर येणार आहे त्या चित्रपटाचे नाव काय हा प्रश्न तर सर्वांनाच पडला होता. वैशाली एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या 'टी टी एम एम' या सिनेमात या दोघांची जोडी पाहायला मिळणार आहे. ललितचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तो या सिनेमासाठी फारच उत्सुक असल्याचे समजतेय. या दोघांची जोडी देखील एकत्र छान दिसतेय. डॉ. संतोष सवाने निर्मित या आगामी सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. ललित-नेहा यांच्यासह विद्याधर जोशी, सविता प्रभुणे, सतिश पुळेकर, सीमा देशमुख, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, पुष्कराज चिरपुटकर, पुष्कर लोणारकर, शर्वरी लोहकरे यांचा अभिनय आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. कुलदीप जाधव या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पंकज पडघन यांनी गाणी संगीतबद्ध केली आहेत. गुरू ठाकुर, क्षितिज पटवर्धन, ओमकार दत्त यांची बहारदार गीते असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे. टी टी एम एम. या सिनेमात आपल्याला कॉलेजियन्सची लव्हस्टोरीच दिसणार का हे मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे. ते काहीही असले तरी नेहा आणि ललितची ही रिफ्रेशींग जोडी मोठ्या पडदयावर कमाल करायला सज्ज झाली आहे. आता त्यांच्या या नव्या जोडीला प्रेक्षक स्वीकारतात का हे तर आपल्याला लवकरच समजेल.