'राणा'च्या'वहिनीसाहेब' सध्या या कामात आहेत बिझी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 15:00 IST2018-01-09T09:30:21+5:302018-01-09T15:00:21+5:30

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंशी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनीला तुम्ही कसे बरे विसरणार. नंदिनी वहिनी म्हणजे अभिनेत्री ...

'Rana's' Vahinya Saheb' are currently working in this business? | 'राणा'च्या'वहिनीसाहेब' सध्या या कामात आहेत बिझी?

'राणा'च्या'वहिनीसाहेब' सध्या या कामात आहेत बिझी?

ुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंशी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनीला तुम्ही कसे बरे विसरणार. नंदिनी वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहयाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत.या मालिकेतील राणा दा (हार्दिक जोशी) आणि पाठकबाईंच्या (अक्षया देवधर) जोडीनं रसिकांची मनं आधीच जिंकली आहेत.त्यापाठोपाठ धनश्रीही आता सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतेय.रसिकांना नंदिनी वहिनीचा येणारा राग हीच धनश्रीच्या भूमिकेची पोचपावती म्हणावी लागेल.राणादाच्या या वहिनी आणि सूरजच्या पत्नीची भूमिका साकारणारी धनश्री सध्या मालिकेबरोबर सिनेमातही झळकणार आहे.'चिठ्ठी' असे या सिनेमाचे नाव असून लवकरच सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.मालिकेच्या सेटवर धमाल मस्ती करतानाचे अनेक फोटो धनश्री सोशल मीडियावर शेअर करत असते.सध्या धनश्री सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. सिनेमाच्या शूटिंगची धमाल मस्ती करतानाचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त धनश्रीने काही फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत.या चित्रपटात अभिनेता शुभांकर एकबोटे आणि धनश्री काडगावकर ही फ्रेश जोडी आपल्यासमोर येणार आहे. डांगे एन्टरटेनमेंटचे विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुतीही त्यांनीच केली आहे.'चिठ्ठी' या चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत साधी,'गर्ल नेक्स्ट डोअर' अशी आहे.या चित्रपटाची लेखिका स्वरदा बुरसेनं माझं नाव या भूमिकेसाठी सुचवलं.मात्र,ऑडिशन वगैरे दिल्यानंतर मला ही भूमिका मिळाली.अतिशय धमाल,मनोरंजक असं हे कथानक आहे. प्रत्येक वयोगटाच्या रसिकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.दिग्दर्शक वैभव डांगे आणि संपूर्ण टीम बरोबर काम करण्याचा अनुभव उत्तम होता.चित्रीकरणापूर्वी आमचं एक वर्कशॉप झालं होतं.चित्रपटात बरेच अनुभवी कलाकार असल्यानं त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.मजेशीर गोष्ट म्हणजे,या चित्रपटात काही लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव धमाल होता असे धनश्रीने सांगितले.छोट्या पडद्यावर वहिनीसाहेब बनत मनं जिंकली आहेत आता रूपेरी पडद्यावरही ती रसिकांचे मनं जिंकणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे. 


Web Title: 'Rana's' Vahinya Saheb' are currently working in this business?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.