'रणपति शिवराय' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालाय रिलीज, लगेच जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:10 IST2026-03-13T13:08:41+5:302026-03-13T13:10:47+5:30
छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांसमोर आला. ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपच पाहता आला नाही त्यांना आता घरबसल्या हा चित्रपट घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे.

'रणपति शिवराय' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालाय रिलीज, लगेच जाणून घ्या
असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांसमोर आला. ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपच पाहता आला नाही त्यांना आता घरबसल्या हा चित्रपट घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे.
६ फेब्रुवारीला ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यामुळे रसिकांना हा चित्रपट घरबसल्या सहकुटुंब बघायला मिळणार आहे. ज्यांच्याकडे प्राईम व्हिडीओचं सबस्क्रीप्शन असेल त्यांना हा चित्रपट मोफत बघता येईल. आज (१३ मार्च) ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्याची बातमी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिली.
महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल.
मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत.