पूजाला पुन्हा काम करायचे राकेशसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 15:49 IST2016-09-01T10:19:36+5:302016-09-01T15:49:36+5:30
प्रत्येक कलाकाराला कोणा ना कोणासोबत काम करण्याची इच्छा असते. पण काही कलाकार बोलून दाखवितात तर काही कलाकार मनातच ठेवतात. ...
.jpg)
पूजाला पुन्हा काम करायचे राकेशसोबत
प रत्येक कलाकाराला कोणा ना कोणासोबत काम करण्याची इच्छा असते. पण काही कलाकार बोलून दाखवितात तर काही कलाकार मनातच ठेवतात. पण प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत हिने बिनधास्त अंदाजात आपल्या भावना सोशलमिडीयावर व्यक्त केल्या आहेत. तिने या भावना राकेश बापटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केल्या आहेत. पूजा सांगते,वृदावंन या चित्रपटात तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव हा छान होता. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. आणि मला पुन्हा तुझ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. पूजा सावंत आणि राकेश बापट यापूर्वी वृदांवन या मराठी चित्रपटात एकत्रित झळकले होते. तर राकेशचा देखील हा पहिलाच मराठी चित्रपट होता. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता चला तर वाट पाहूयात की, पूजाची ही इच्छा कधी पूर्ण होणार?