राजेंद्र-स्मिताची हटके जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 16:09 IST2016-09-13T10:39:02+5:302016-09-13T16:09:02+5:30
स्मिता गोंदकर प्रेक्षकांना नेहमीच ग्लॅमरस भूमिकेमध्ये पाहायला मिळाली आहे. पप्पी दे पारूला ...
.jpg)
राजेंद्र-स्मिताची हटके जोडी
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
स्मिता गोंदकर प्रेक्षकांना नेहमीच ग्लॅमरस भूमिकेमध्ये पाहायला मिळाली आहे. पप्पी दे पारूला आणि कांताबाई या तिच्या गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. स्मिता आता मिस्टर अॅन्ड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटात वेगळ््या भूमिकेमध्ये दिसणार आहे. परंतू स्मिताची जोडी राजेंद्र शिसतकर याच्यासोबत या चित्रपटामध्ये जमली आहे . राजेंद्रला प्रेक्षकांनी डॅशिंग भूमिकांमध्येच पाहिले होते आणि आता एकदम रोमँटिक भूमिकेत तो दिसणार आहे. याबद्दल राजेंद्र सांगतो, स्मिता गोंदकर सोबत आपल्याला काम करायचे आहे हे समजल्यावरच मला वाटले आपली जोडी कशी दिसेल. परंतू आमची ही लव्ह स्टोरी नवरा बायकोची असल्याने आम्ही कॅमेºयावर छान दिसलो. अनेकदा रोमँटिक सीन्स करताना माझी फसगत व्हायची. मला डिरेक्टर म्हणायचे देखील अरे तुझ्यातील इन्सपेक्टर आता बाजूला ठेव आणि जरा रोमँटिक हो. आता स्मिताच्या पतीची भूमिका करायची म्हटल्यावर मला जरा तयारी करावीच लागली. म्हणून मी या चित्रपटासाठी माझे १० किलो वजन देखील कमी केले. पडद्यावर तुम्हाला या गोष्टी दिसतीलच. आमची जोडी जरी हटके असली तरी केमिस्ट्री मात्र जबरदस्त जुळून आली आहे. स्मिता आणि राजेंद्रचे हे ट्युनिंग पडद्यावर किती कमाल करतेय हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.