'राजन' सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 17:28 IST2017-07-01T11:58:08+5:302017-07-01T17:28:08+5:30

‘राजन’ शीर्षकामुळे सध्या हा सिनेमा खूप चर्चेत आहे. हा सिनेमा अंडरवल्ड डॉन छोटा राजनवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ...

'Rajan' complete the film shooting! | 'राजन' सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण !

'राजन' सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण !

ाजन’ शीर्षकामुळे सध्या हा सिनेमा खूप चर्चेत आहे. हा सिनेमा अंडरवल्ड डॉन छोटा राजनवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच सिनेमाविषयी रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून हा सिनेमासाठी पाहण्यासाठी आणखी थोडी रसिकांना वाट पहावी लागणार आहे.सिनेमाविषयी रसिक अनेक तर्कवितर्क लावत असले तरी हा सिनेमा ९० च्या दशकात मुंबईत राज्य करणारा ‘छोटा राजन’ वर आधारित असल्याचे बोलले जात आहे. तुर्तास, याबाबत कोणतीच अधिकृत बातमी समोर आली नसली तरी, या सिनेमाच्या टिजर पोस्टरचा आवाज सोशल साईटवर ऐकायला मिळत आहे. या सिनेमाच्या पहिल्या टिजर पोस्टरवर पोलीस कोठडीचे चित्र दिसत असून, नुकतेच प्रदर्शित झालेल्या दुस-या पोस्टरवर 'वॉन्टेड' या अद्याक्षराच्या खाली सिहांची प्रतिकृती दिसत असल्यामुळे, हा सिनेमा तत्कालीन मुंबईतील गुंडगिरीवर भाष्य करणारा आहे, असा अंदाज येतो.या सिनेमाबद्दल सांगताना दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी, 'राजन' हा सिनेमा वास्तविक जीवनावर बेतला असल्याचे सांगितले. 'प्रेक्षकांनी हा सिनेमा एक मनोरंजनाचा भाग म्हणून पहावा. १९८३ ते १९९३ सालातली मुंबई आणि त्यावेळचा गँगवॉर आजच्या पिढीलासुद्धा कळले पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा असून, त्यावेळी मी जे काही पाहिले आणि बातम्यातून जाणले, तेच मी माझ्या लेखणीतून मोठ्या पडद्यावर सादर केले आहे' असे त्यांनी सांगितले. तसेच, हा 'राजन' हा सिनेमा कोणाच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित नसून, त्याकाळच्या परीस्थीला प्रेरित होऊन बनवलेला सिनेमा आहे, ज्यात सिनेमाचा नायक हा 'राजन' आहे, असे देखील ते पुढे स्पष्टीकरण देतात. या सिनेमातील स्टारकास्टबाबत सध्या गुप्तता पाळण्यात आली असली तरी संतोष जुवेकर  राजन भूमिकेत झळकणार आहे. लवकरच मराठीच्या सिल्व्हर स्क्रिनवरचा हा ‘राजन’ नेमका रसिकांमध्ये कितपत थरार निर्माणे करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

Web Title: 'Rajan' complete the film shooting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.