​रॉकी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राहुल देव झाला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 10:51 IST2017-07-12T05:21:09+5:302017-07-12T10:51:09+5:30

बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकल्यानंतर अभिनेता राहुल देव आता मराठी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रॉकी’ या अ‍ॅक्शनपॅक्ड मराठी ...

Rahul was injured during filming of Rocky film | ​रॉकी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राहुल देव झाला जखमी

​रॉकी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राहुल देव झाला जखमी

लिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकल्यानंतर अभिनेता राहुल देव आता मराठी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रॉकी’ या अ‍ॅक्शनपॅक्ड मराठी सिनेमाच्या माध्यमातून राहुल देव पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहे. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने तरुणाईच्या पसंतीस उतरेल अशी कथा विषय, संगीत असलेले चित्रपट अलीकडच्या काळात कौतुकास पात्र ठरलेत हेच लक्षात घेऊन लवकरच ‘रॉकी’ हा अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात राहुल एका वेगळ्या अंदाजात दिसला.
चित्रपटाच्या अथवा मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान अपघात होणे हे नवीन नाही. नुकताच एक अपघात रॉकी या चित्रपटाच्या सेटवर झाला आहे. 
या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान राहुल देवला सेटवर अपघात झाला. सुर्वे फार्म येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना हाणामारीच्या एका प्रसंगात त्याला ही दुखापत झाली आहे. चित्रपटाचा नायक संदीप साळवे याच्यासोबत हाणामारीच्या प्रसंगाचे चित्रीकरण होत असताना हा अपघात घडला.
रॉकी या चित्रपटासाठी हाणामारीचे एक दृश्य राहुल देव आणि संदीप साळवे यांच्यावर चित्रित करायचे होते. यासाठी डमी न वापरता हा सीन राहुल देवने स्वत: करण्याचे ठरवले. तो सीन करत असताना अचानक राहुल देव जमिनीवर ठेवण्यात आलेल्या ट्यूबलाईट सेटवर जाऊन आदळला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. यानंतर काही वेळासाठी चित्रीकरण थांबविण्यात आले. पण राहुलने झालेल्या दुखापतीची पर्वा न करता प्राथमिक उपचार घेऊन हा सीन यशस्वीरित्या पूर्ण केला. तेव्हा उपस्थित सर्वच टीमने राहुल देवच्या कामाप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.

Also Read : सरस्वती या मालिकेतील अक्षया हिंदळकर रॉकी चित्रपटात

Web Title: Rahul was injured during filming of Rocky film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.