राहुल देव पहिल्यांदाच झळकणार मराठी सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 10:12 IST2017-05-16T04:42:45+5:302017-05-16T10:12:45+5:30
बॉलिवूड, टॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकल्यानंतर अभिनेता राहुल देव आता मराठी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, होय, ‘रॉकी’ ...

राहुल देव पहिल्यांदाच झळकणार मराठी सिनेमात
ब लिवूड, टॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकल्यानंतर अभिनेता राहुल देव आता मराठी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, होय, ‘रॉकी’ या अॅक्शनपॅक्ड मराठी सिनेमाच्या माध्यमातून राहुल देव पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने तरुणाईच्या पसंतीस उतरेल असा कथा विषय, संगीत असलेले चित्रपट अलीकडच्या काळात कौतुकास पात्र ठरलेत हेच लक्षात घेऊन लवकरच ‘रॉकी’ हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या सिनेमाचा मुहूर्त नुकताच बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक अहमद खानच्या हस्ते करण्यात आला.हा चित्रपट रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करेल असा विश्वास व्यक्त करताना अहमद खानने चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. रोमान्स, फॅमिली ड्रामा आणि अॅक्शन याचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या ‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत.प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने निर्माता–दिग्दर्शकांची नवी फळी मराठी चित्रपटात नवनवे बदल करू पाहतेय. तरुणाईच्या पसंतीस उतरेल असा कथा विषय, संगीत असलेले चित्रपट अलीकडच्या काळात कौतुकास पात्र ठरलेत हेच लक्षात घेऊन सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्सने ‘रॉकी’ हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच बॉलिवूड मधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांच्या हस्ते संपन्न झाला. हा चित्रपट रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करेल असा विश्वास व्यक्त करताना अहमद खान यांनी चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.रोमान्स, फॅमिली ड्रामा आणि अॅक्शन याचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या ‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील अभिनेते राहुल देव ही या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत.