​राहुल देशपांडेचा लंडन दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 18:39 IST2017-04-07T13:09:19+5:302017-04-07T18:39:19+5:30

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या लंडनला आहे. तो लंडनमध्ये एका कामाच्या निमित्ताने गेला आहे. पण त्यातूनसुद्धा वेळ काढून तो ...

Rahul Deshpande's London Tour | ​राहुल देशपांडेचा लंडन दौरा

​राहुल देशपांडेचा लंडन दौरा

रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या लंडनला आहे. तो लंडनमध्ये एका कामाच्या निमित्ताने गेला आहे. पण त्यातूनसुद्धा वेळ काढून तो त्याच्या फॅन्सच्या संपर्कात राहात आहे. तो लंडनमधील अनेक जागांवर जाऊन तिथून फेसबुक लाइव्ह करत आहे. तसेच तो तिथल्या विविध ठिकाणांचे फोटोदेखील टाकत आहे. त्याने लंडन डायरीज लिहायला सुरुवात केली आहे. तो तिथे जाऊन  त्याच्या जुन्या मित्रमैत्रिणांनादेखील भेटत आहे. त्याने नुकतेच त्याच्या एका मित्राच्या घरी जाऊन फेसबुक लाइव्ह केले आणि तिथून आपल्या मित्राची त्याच्या फॅन्सना ओळख करून दिली आणि त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्याच्या फॅन्सना त्याने अभिवादनदेखील केले.  
राहुल देशपांडेने कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गायलेली गाणी चांगलीच हिट झाली होती. एक शास्त्रीय गायक म्हणून आज त्याने त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची गाणी ऐकण्यासाठी त्याचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. त्याच्या फॅन्ससाठी त्याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून अनेक गाणी गाऊन दाखवली. त्याच्या फॅन्सने अनेक गाणी गाण्याची फर्माइश केली होती आणि त्यानेदेखील त्यांची ही फर्माइश मान्य केली. राहुलच्या मित्राच्या घरात अनेक वाद्य होती आणि या वाद्यांसोबत त्याने गाणी सादर केली तर काही गाणी वादकांशिवायदेखील गायली.
राहुल सध्या आपल्याला एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. त्याने डोक्यावर अगदीच कमी केस ठेवले आहेत. त्याच्या या नवीन लूकबद्दल फेसबुक लाइव्हच्यावेळी त्याने त्याच्या फॅन्सना सांगितले की हा नवा लूक त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी आहे. त्याच्या या लूकचे त्याचे फॅन्सनेदेखील चांगलेच कौतुक केले.  

Web Title: Rahul Deshpande's London Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.