रघुवीर यादव झळकणार सेंटिमेंटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 17:03 IST2017-04-17T11:33:56+5:302017-04-17T17:03:56+5:30
रघुवीर यादवने माया मेमसाब, बँडिट क्वीन, अशोका, डरना मना है, गायब, पीपली लाइव्ह यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने ...

रघुवीर यादव झळकणार सेंटिमेंटलमध्ये
र ुवीर यादवने माया मेमसाब, बँडिट क्वीन, अशोका, डरना मना है, गायब, पीपली लाइव्ह यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी चित्रपटांमध्ये अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयातून तो खूप चांगला अभिनेता असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.
रघुवीर आता हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठीतदेखील झळकणार आहे. रघुवीर मराठी चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. अंजली पाटीलसोबत तो मराठी चित्रपटात झळकणार असल्याची कित्येक दिवसांपासूनची चर्चा आहे. पण अद्याप हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेला नाही. पण आता रघुवीर प्रेक्षकांना आणखी एका मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी त्याने चित्रीकरणदेखील सुरू केले आहे.
पोस्टर गर्ल आणि पोस्टर बॉय हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील एक नवीन मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सेंटिमेंटल असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू असून या चित्रपटात उपेंद्र लिमये प्रमुख भूमिकेत आहे. एवढेच नव्हे तर अनेक वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे अशोक सराफ मोठ्या पडद्यावर परतत आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना रघुवीर यादवदेखील पाहायला मिळणार आहे. रघुवीरने या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरणदेखील केले आहे. मुंबई पोलिसांच्या मानसिकतेवर या चित्रपटात कॉमेडीच्या अंगाने भाष्य केले जाणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण नुकतेच बिहारमध्ये करण्यात आले आहे.