ही प्रसिद्ध गायिका आहे सचित पाटीलची पत्नी, एखाद्या अभिनेत्रीइतकीच आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 01:23 PM2019-12-24T13:23:32+5:302019-12-24T13:28:40+5:30

सचित पाटीलची पत्नी ही प्रसिद्ध गायिका असून तिने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यानेच सोशल मीडियावर नुकताच तिचा फोटो शेअर केला आहे.

Radha Prem Rangi Rangali fame Sachit Patil is married to singer shilpa pai | ही प्रसिद्ध गायिका आहे सचित पाटीलची पत्नी, एखाद्या अभिनेत्रीइतकीच आहे सुंदर

ही प्रसिद्ध गायिका आहे सचित पाटीलची पत्नी, एखाद्या अभिनेत्रीइतकीच आहे सुंदर

googlenewsNext
ठळक मुद्देसचितच्या लग्नाचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने लग्नाचा फोटो शेअर करत पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा पै असून तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत.

सचित पाटीलने क्यों या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर सब कुछ है कुछ भी नही, रास्ता रोको यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. त्यानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याने दिग्दर्शित केलेल्या साडे माडे तीन या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली. त्यानंतर त्याने अवधुत गुप्तेच्या झेंडा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली.

क्षणभर विश्रांती या चित्रपटात त्याने काम करण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने अर्जुन, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्याची राधा प्रेम रंग रंगली ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे.

सचितला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग असून त्याच्याविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सचित पाटीलची पत्नी ही प्रसिद्ध गायिका असून तिने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यानेच सोशल मीडियावर नुकताच तिचा फोटो शेअर केला आहे. सचितच्या लग्नाचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने लग्नाचा फोटो शेअर करत पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा पै असून तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. तिने मराठीसोबतच भोजपूरी भाषेत देखील गाणी गायली आहेत. सचितच्या क्षणभर विश्रांती या चित्रपटातील अनेक गाणी तिने गायलेली असून या गाण्यांना रसिकांची पसंती मिळाली आहे. 

सचितच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला शिल्पाचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. ते कमेंटच्या माध्यमातून नेहमीच याविषयी सांगत असतात. 

Web Title: Radha Prem Rangi Rangali fame Sachit Patil is married to singer shilpa pai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.