पुष्कर श्रोत्रीच्या उबुंतु चित्रपटात सर्व नवे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:17 IST2017-01-22T08:47:51+5:302017-01-22T14:17:51+5:30
सध्या मराठी चित्रपटांमध्ये अनेक वेगळे विषय येताना आपण पाहतो. फक्त प्रेमकथांमध्ये न अडकता बºयाच सामाजिक विषयांच्या कथा मराठी चित्रपटांतून ...

पुष्कर श्रोत्रीच्या उबुंतु चित्रपटात सर्व नवे कलाकार
स ्या मराठी चित्रपटांमध्ये अनेक वेगळे विषय येताना आपण पाहतो. फक्त प्रेमकथांमध्ये न अडकता बºयाच सामाजिक विषयांच्या कथा मराठी चित्रपटांतून उलगडण्यात आलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा सामाजिक विषयावर भाष्य करणारा अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा उबंतु हा सिनेमा सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्क्रीनिंग पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये करण्यात आले होते. या चित्रपटा विषयी बोलताना पुष्कर सांगतो, मुलांच्या दृष्टीने शाळेचे नेमके महत्व कशात आहे, हे सांगण्यासाठी उबंतु या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून या चित्रपटात बंद पडणारी एक शाळा चालू राहण्यासाठी त्या शाळेतील मुले कोणते धाडस करतात, त्याची कथा सांगण्यात आली आहे. एकप्रकारे शाळेचे नेमके महत्त्व सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट काढण्यापूर्वी मी खूप शाळांना भेटी देऊन तेथील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती करून घेतली. या चित्रपटात काम करणाºया मुलांची मला अभिनयाच्या दृष्टीने कोरी पाटी हवी होती, व तो विचार करूनच सर्व नवखी मुले घेतली. आता या चित्रपटातील या नव्या कोºया कलाकारांनी कशाप्रकारे आपले अभिनय कौशल्य दाखविले आहे हे पाहणे खरचं औत्सुक्याचे असणार आहे. परंतू मराठी चित्रपटांमध्ये नवीन कलाकार जरी असले तरी ते लाजवाबच अभिनय करतात हे आपण पाहीलेच आहे.