पुष्कर श्रोत्री म्हणतोय, 'श्श… घाबरायचं नाही', जाणून घ्या काय आहे ही भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:18 IST2025-07-26T17:18:25+5:302025-07-26T17:18:52+5:30

Pushkar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्री लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pushkar Shrotri is saying, 'Shh... Ghabraycha Naahi', he will be seen new marathi play | पुष्कर श्रोत्री म्हणतोय, 'श्श… घाबरायचं नाही', जाणून घ्या काय आहे ही भानगड?

पुष्कर श्रोत्री म्हणतोय, 'श्श… घाबरायचं नाही', जाणून घ्या काय आहे ही भानगड?

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) लवकरच  'श्श… घाबरायचं नाही' (Shh... Ghabraycha Naahi Marathi Play) या नाटकात दिसणार आहे. या नाटकात तो  एक वेगळ्या शैलीतील, वेगळ्या स्वरुपातील अभिनय करताना दिसणार आहे. मराठी रंगभूमीचा प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी नाटक बघत नाही, तर त्याला वेगळं, काहीतरी आशयघन अनुभवायचं असतं असा ठाम विश्वास पुष्करने व्यक्त केला.

पुष्कर श्रोत्री म्हणाला की, मी काय वेगळं करू शकतो?” या विचारातून या सादरीकरणाची कल्पना जन्माला आली, असं पुष्कर सांगतो. “माझ्या करिअरमध्ये मी अनेक प्रकारची नाटकं केली, पण मतकरींच्या गूढशैलीतील संहितेला रंगमंचावर बोलकं करणं ही एक वेगळीच जबाबदारी आहे. बदाम राजा प्रॉडक्शन आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत यापूर्वी ‘अ परफेक्ट मर्डर’ सारखं सस्पेन्स नाटक साकारताना पुष्करला जाणवलं की विनोदी नाटकांच्या गर्दीत प्रेक्षक काही तरी वेगळं शोधत असतो. आणि म्हणून मतकरींच्या गूढ कथांना नाट्यरूप देण्याचा विचार केला. 


रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्यातलं असं नाव आहे, जे मराठी सृजनविश्वात कायमस्वरूपी कोरले गेलेलं आहे. त्यांनी गूढ कथांच्या माध्यमातून मराठी साहित्यात एक स्वतंत्र आणि प्रभावी वाट निर्माण केली. त्यांच्या कथा भयाच्या पलीकडची, माणसाच्या अंतर्मनाशी बोलणाऱ्या आहेत आणि त्याच लेखनशैलीला नव्या स्वरुपात उलगडण्याचा ध्यास घेऊन हा नाट्यप्रयोग साकारला जातोय. पुष्कर सांगतो की, जगभरात सस्पेन्स, मिस्ट्री, थ्रिलर या जॉनरला तरुण प्रेक्षक आकर्षित होतोच. मग मराठी रंगभूमी याला अपवाद का ठरावी? मतकरींची भाषा बोलायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. ती भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्यच आहे. या संकल्पनेची निर्मिती ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ने केली असून श्श… घाबरायचं नाहीचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, ३१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, मुंबईतील ओपेरा हाऊस येथे सादर होणार आहे.
 

Web Title: Pushkar Shrotri is saying, 'Shh... Ghabraycha Naahi', he will be seen new marathi play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.