पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी व प्रार्थना बेहरे दिसणार ह्या सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 14:32 IST2018-12-18T14:29:24+5:302018-12-18T14:32:19+5:30
‘ती & ती’ या चित्रपटाचे आणखी एक नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी व प्रार्थना बेहरे दिसणार ह्या सिनेमात
काही दिवसांपूर्वी अभिनेता पुष्कर जोगचा दोन तरूणींसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या दोन मुली कोण आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती. हा फोटो पुष्कर जोगचा आगामी चित्रपट ‘ती & ती’चा पोस्टर होता. त्या दोन मुली कोण होत्या याचा खुलासा नुकताच झाला आहे. ‘ती & ती’ या चित्रपटाचे आणखी एक नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात पुष्कर जोगसोबत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघी ‘ती’ आणि ‘ती’ ची भूमिका साकारणार आहेत.
आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केली असून अभिनयासोबत पुष्करने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. पुष्करसह, आनंद पंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.
अर्बन रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘ती & ती’चे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या-इंटरेस्टिंग आणि मनोरंजक कथेसोबत प्रेक्षकांची लंडन सफारी पण होणार आहे.
प्रेमाचा जेव्हा ट्रँगल बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टीचे कन्फ्युजन वाढते. अशीच प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची कथा आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा ‘ती & ती’ चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.