Pushkar Jog : 'मराठी चित्रपटांची गळचेपी, भीक मागून...'मराठी सिनेमांच्या अवस्थेवर पुष्कर जोग स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 09:32 AM2022-12-19T09:32:52+5:302022-12-19T09:34:56+5:30

मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाही ही नेहमीचीच खंत आहे. व्हिक्टोरिया या सिनेमामुळे ते पुन्हा अधोरेखित झाले आहे

pushkar-jog-postpones-marathi-film-victoria-because-of-avatar-2-got-more-screens | Pushkar Jog : 'मराठी चित्रपटांची गळचेपी, भीक मागून...'मराठी सिनेमांच्या अवस्थेवर पुष्कर जोग स्पष्टच बोलला

Pushkar Jog : 'मराठी चित्रपटांची गळचेपी, भीक मागून...'मराठी सिनेमांच्या अवस्थेवर पुष्कर जोग स्पष्टच बोलला

googlenewsNext

Pushkar Jog : निर्माता आणि अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) बहुचर्चित चित्रपट व्हिक्टोरिया नाईलाजाने पुढे ढकलावा लागला. १६ डिसेंबरला व्हिक्टोरिया रिलीज होणार होता मात्र 'अवतार २' (Avatar 2) या हॉलिवुड चित्रपटामुळे व्हिक्टोरियाला फारसे स्क्रीन मिळू शकले नाहीत. इतर चित्रपटांमुळे मराठी चित्रपटाला शोकेसिंग मिळत नाही अशी खंत पुष्करने व्यक्त केली आहे. 

मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाही ही नेहमीचीच खंत आहे. व्हिक्टोरिया या सिनेमामुळे ते पुन्हा अधोरेखित झाले आहे. 'व्हिक्टोरिया' या बहुचर्चित मराठी चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड मध्ये झाले आहे. मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर आणि थ्रिलर अशी वेगळी कलाकृती घेऊन येणाऱ्या व्हिक्टोरिया सिनेमाला इतर चित्रपटाचा फटका बसला आहे. आत्ताच चित्रपट रिलीज करुन मी ही कलाकृती वाया घालवणार नाही अशी प्रतिक्रिया पुष्करने दिली आहे. 

एका पॉडकास्टमध्ये पुष्करने सांगितले, आपल्या इथे मराठी चित्रपटांना योग्य शोकेसिंग मिळत नाही. मराठी सिनेमांची गळचेपी होतेय, स्क्रीन्स साठी भीक मागावी लागते. व्हिक्टोरियाच्या ट्रेलरला प्रतिसाद मिळाला. १६ तारखेला अवतार २ होता सोबत २ मराठी चित्रपट होते. २३ ला सर्कस हा हिंदी सिनेमा आहे. व्हिक्टोरिया मध्ये खूप क्षमता आहे. मराठी प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवतार सारखं शोकेसिंग आम्हाला मिळणं शक्यच नव्हतं. म्हणून मी सिनेमा पुढे ढकलला. मराठी चित्रपटांना केवळ १०० शो मिळतात त्यातून काहीच रिकव्हरी होत नाही.यामुळे आर्थिक संकट ओढावतं. प्रचंड नुकसान होतं. व्हिक्टोरियाला फक्त २५ ते ३० शो च मिळत होते मग मी हा सिनेमा का लावू? मराठीसाठी एक्सक्लुझिव्ह वेगळे थिएटर सुरु झाले पाहिजेत असे मला वाटते. 

पुष्करचा निर्माता म्हणून हा ४ था सिनेमा आहे. मात्र प्रत्येक चित्रपटावेळी त्याला या अडचणींचा सामना करावा लागला आहे. व्हिक्टोरिया आता पुढील वर्षी १३ जानेवारी रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटांची गळचेपी कधी थांबणार हा प्रश्न अजुनही मराठी कलाकारांसमोर आहे.

Web Title: pushkar-jog-postpones-marathi-film-victoria-because-of-avatar-2-got-more-screens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.