मराठी चित्रपटांचे 'हब' पुणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:14 IST2016-01-16T01:12:24+5:302016-02-08T04:14:05+5:30

पुणे तिथे काय उणे? असे नेहमी म्हटले जाते.. ते बरोबरच आहे म्हणा! काही मंडळींना हे जरा खटकू शकते.. पण ...

Pune 'Marathi Marathi Movie' | मराठी चित्रपटांचे 'हब' पुणे

मराठी चित्रपटांचे 'हब' पुणे

णे तिथे काय उणे? असे नेहमी म्हटले जाते.. ते बरोबरच आहे म्हणा! काही मंडळींना हे जरा खटकू शकते.. पण गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यानं हे सिद्धही करून दाखवलं आहे.. स्मार्ट शहराच्या यादीमध्ये पुण्याचा तर आवर्जून समावेश करण्यात आला आहे.. इतकंच काय गजबज कोलाहलापासून रिलिफ मिळण्यासाठी पुण्यातच स्थायिक होण्याचं प्रमाणही वाढत आहे.. आता तुम्ही म्हणाल एकदम इतर शहरं सोडून पुण्याची तारीफ कशी काय सुरू झाली.. म्हणजे प्रयोजन काय? हा प्रश्न पडणं अधिकच स्वाभाविक आहे. तर त्याचे उत्तर आहे मराठी चित्रपटाचे पुण्याशी जोडले गेलेले अतूट नाते!

एक काळ असा होता, की मराठी चित्रपटच काय, पण बॉलिवूडकरांची पंढरी कुठली असेल तर ती 'मुंबई,' असचं ऐकायला मिळायचे. त्यामुळे अभिनयात करिअर घडवायचे असेल तर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. यातच स्टुडिओज, शूटिंगसाठी नरीमन पॉईंट, क्वीन्स नेकलेस, गेट वे ऑफ इंडिया अशी एक ना अनेक लोकेशन्स सहजरीत्या मिळायची. त्यामुळे मुंबईलाच प्राधान्यक्रम दिला जायचा! पण गेल्या काही वर्षांत पुण्यानंही चित्रपटसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे. के मुंबई हे तंत्रज्ञानासाठी उत्तम शहर नक्कीच आहे. पण त्यापेक्षाही चित्रपटासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या पुण्यात लवकर आणि सहजरीत्या उपलब्ध होतात. पुण्यातील हवामान चित्रपटाच्या शूटिंग्जसाठी योग्य आहेच, पण त्याशिवाय आऊटडोअर लोकेशन्ससाठी लागणारी परवानगी पुण्यात लवकर मिळते. त्याबरोबरच मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर असल्याने तिथे मराठमोळं वातावरण पाहायला मिळत नाही, जे पुण्यात उपजतच आहे.

- सतीश राजवाडे, दिग्दर्शक

Web Title: Pune 'Marathi Marathi Movie'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.