रिले सिंगिंग द्वारे प्रथमच मराठी चित्रपटाचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 15:53 IST2017-02-28T10:23:41+5:302017-02-28T15:53:41+5:30

  'अंगार'चे निमार्ते -दिग्दर्शक विराग मधूमालती वानखडे यांनी हा प्रयोग यशस्वी करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. 'रिले सिंगिंग'च्या प्रयोगाला गिनीज बुक आॅफ ...

Promotion of Marathi Film for the first time by Riley Singing | रिले सिंगिंग द्वारे प्रथमच मराठी चित्रपटाचे प्रमोशन

रिले सिंगिंग द्वारे प्रथमच मराठी चित्रपटाचे प्रमोशन

  
'अंगार'चे निमार्ते -दिग्दर्शक विराग मधूमालती वानखडे यांनी हा प्रयोग यशस्वी करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. 'रिले सिंगिंग'च्या
प्रयोगाला गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विराग प्रयत्नात आहेत. त्यांनी नेहमीच स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. नेत्रदान मोहिमेसाठी त्यांनी १०० दिवस डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा देखील विक्रमी उपक्रम केला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अब तोडेगा इंडिया या रियालिटी शोच्या माध्यमातून १५५ तबला वादकांसोबत सातत्याने दीड मिनिटं एकाच सूरात तबला वादनाचा विक्रम त्यांनी केला आहे. या तबला वादनाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याने आता रिले सिंगिंग देखील यशस्वी होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे. या उपक्रमासाठी सध्या मुंबईत आॅडिशन्स सुरु आहेत.  आतापर्यंत ५००उत्स्फूर्त स्पर्धकांनी या उपक्रमासाठी आॅडिशन्स दिल्या आहे. मुंबईत होत असलेल्या आणि पुणे नाशिक सोबत मराठवाडा आणि विदभार्तील अनेक जिल्ह्यात होणाºया आॅडिशन्स मधून निवडक ३०० गायक या कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत. 'चक दे' प्रॉडक्शन निर्मित 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या मराठी चित्रपटाचे विराग निमार्ता आणि दिग्दर्शक आहेत.
           काळोखाला भेदून टाकू... जीवनाला उजळून टाकू या गाण्यावर आधारित हे 'रिले सिंगिंग' होणार आहे. एकूण १०८ शब्दांचं असलेलं हे गाणं ३०० गायक एकाच लयीत-सूरात गाणार आहेत. डॉ. तात्या लहाने... या चित्रपटातील हे मूळ गीत विराग यांनी शब्दबद्ध केलं असून सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या साथीने त्यांनी हे ड्युएट सॉंग गायलं आहे. 'एक हिंदुस्थानी' या संगीतकाराने हे गाणं कंपोझ केले आहे. 'रिले सिंगिंग'चा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापर करणं हा भारतीय चित्रपट सृष्टीत पहिलाच प्रयोग असल्याने सगळ्यांचं लक्ष 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या चित्रपटाकडे लागले आहे. या गाण्याच्या माध्यमातून डॉ लहाने यांच्या कारकिदीर्ला मानवंदना वाहिली आहे. त्यांचे समाजकार्य जगातील कानाकोपºयात पोहोचावे या हेतूने हा चित्रपट तयार करण्यात आल्याचे निमार्ते-दिग्दर्शक विराग यांनी सांगितले. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: Promotion of Marathi Film for the first time by Riley Singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.