हाफ तिकीट चित्रपट लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 12:51 IST2016-06-16T07:20:45+5:302016-06-16T12:51:18+5:30

समित कक्कड दिग्दर्शित हाफ तिकीट चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. १५ जुलैला प्रदर्शित होणारा हा चित्रपट २२ जुलैला ...

Prolong the half-ticket film | हाफ तिकीट चित्रपट लांबणीवर

हाफ तिकीट चित्रपट लांबणीवर

ित कक्कड दिग्दर्शित हाफ तिकीट चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. १५ जुलैला प्रदर्शित होणारा हा चित्रपट २२ जुलैला  प्रदर्शित होणार आहे. 
मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारे दोन भाऊ, त्यांची एक छोटीशी इच्छा आणि  बापाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी चाललेली आईची धडपड यांवर हाफ तिकीट यावर आधारित हा चित्रपट आहे. फॉक्स स्टार स्टुडियोझ  आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत  हाफ तिकीटची निर्मिती नानूभाई जयसिंघानी, सुरेश जयसिंघानी व मोहित जयसिंघानी यांनी केली आहे.मुंबईचं आजवर कधीही न दिसलेलं रुप आणि नाविन्यपूर्ण संगीत या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव हा हाफ तिकीट या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता या चित्रपटाची थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

Web Title: Prolong the half-ticket film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.