अमर फोटो स्टुडियो हे नाटक सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ नाट्ससंस्थेची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 14:00 IST2016-08-01T08:30:11+5:302016-08-01T14:00:11+5:30
मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकात आणि चित्रपटात अभिनय करणारे अभिनेते सुनील बर्वे यांचे बरेच फॅन्स आहेत. सुनील बर्वे यांच्या ...

अमर फोटो स्टुडियो हे नाटक सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ नाट्ससंस्थेची निर्मिती
सुनील बर्वे यांची ‘सुबक’ नावाची नाट्यसंस्था आहे. या संस्थेतर्फे ते काही जुन्या नाटकांचे मर्यादित प्रयोग रंगमंचावर सादर करणार आहेत. गोजिरी, तू तिथं मी, लपंडाव, लालबागचा राजा, बंध नायलॉनचे, नटसम्राट आदी मराठी आणि अस्तित्व, टुन्नू की टिना, निदान या हिंदी चित्रपटात काम केले आहे.
सुनील बर्वे यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत नाटकं केली आहेत. मराठीत अफलातून, असेच आम्ही सारे, ऑल दि बेस्ट, इथे हवंय कुणाला प्रेम, चारचौघी, मोरुची मावशी, वन रुम किचन, श्री तशी सौ. आदी., टी, कॉफी और मी हे हिंदी नाटक, मासीबा हे गुजराती नाटक आणि ऑल दि बेस्ट हे इंग्रजी नाटक केले आहे.
मराठीतील अवंतिका, अवंती, ऊनपाऊस, झोका, कुंकू, वळवाचा पाऊस, श्रीयुत गंगाधर टिपरे आदी मालिकेत सुनील यांनी काम केले आहे. आणि नाटकांप्रमाणे हिंदी आणि गुजराती मालिकेत पण काम केले आहे. अभी तो मैं जवान हूँ, कर्तव्य, कोरा कागज, कौन अपना कौन पराया, सप्तर्षी या हिंदी मालिका आणि छैलछबीला, ज्योती या गुजाराती मालिका केल्या आहेत.
सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ नाट्ससंस्थेची निर्मिती असलेला अमर फोटो स्टुडियो हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.