प्रियाचे फेव्हरेट आउटफीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 16:14 IST2016-08-27T10:44:46+5:302016-08-27T16:14:46+5:30
अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी सई ताम्हणकर, मानसी नाईक, पूजा सावंत, प्रिया बापट या अभिनेत्री सोशलमिडीयावर फारच हीट होताना दिसत ...
.jpg)
प्रियाचे फेव्हरेट आउटफीट
मृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी सई ताम्हणकर, मानसी नाईक, पूजा सावंत, प्रिया बापट या अभिनेत्री सोशलमिडीयावर फारच हीट होताना दिसत आहे. या अभिनेत्री सतत सोशलमिडीयावर विविध पेहरावातील फोटो अपलोड करीत असतात. कोणता ही इव्हेंट असो या चित्रपटाचे स्क्रिनींग यासाठी सुंदर आउटफीट परिधान करून छानशी मेकअपमधील एक झलक सोशलमिडीयावर टाकत असतात. मध्यंतरी अमृता खानविलकरने तर विविध लूकमधील आपले फोटो सोशलमिडीयावर अपडेट केले होते. आता तर, प्रेक्षकांची चुलबूली अभिनेत्री प्रिया बापटने देखील एक सुंदर आउटफीटमधील फोटो सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. यामध्ये प्रि़याने सुंदर अॅनिमल प्रिटेंडमधील आउटफीट परिधान केला आहे. कानात छानसे टॉप घातले आहेत. त्याचप्रमाणे केसदेखील बांधल्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. प्रियाने हे फ्रेव्हरेट आउटफीट असल्याचे सोशलमिडीयावर सांगितले आहे.
![]()