​प्रियांका ‘व्हेंटीलेटर’मधून करतेय बाबांची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 09:41 IST2016-11-03T22:06:36+5:302016-11-04T09:41:26+5:30

‘बाबा’ थांब ना रे तू’ असे या चित्रपटातील गाण्याचे बोल आहेत

Priyanka's 'Ventilator' reminds me of Baba | ​प्रियांका ‘व्हेंटीलेटर’मधून करतेय बाबांची आठवण

​प्रियांका ‘व्हेंटीलेटर’मधून करतेय बाबांची आठवण

ong>इंटरनॅशनल स्टार म्हणून ख्याती मिळविणारी प्रियांका चोप्राने ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात आपल्या वडिलांची आठवण करून देणारे गाणे गायले आहे. प्रियांका चोप्राचे तिच्या बाबांसोबत एक खास नाते होते. याचमुळे तिने आपल्या बॅनरखाली निर्मित होणाºया पहिल्या चित्रपटातील एक गाणे वडिलांना समर्पित केले आहे. ‘व्हेंटिलेटर’ या निर्मिती करून तिने मराठी चित्रपटात व चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे, हे विशेष. 

‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटामध्ये प्रियांकाने पाहुणी कलाकार म्हणूनही हजेरी लावली आहे. ‘बाबा’ थांब ना रे तू’ असे या चित्रपटातील गाण्याचे बोल आहेत, प्रियांका हे गाणे गाताना भावूक झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या आयुष्यात असलेले वडिलांचे स्थान आणि त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट या सर्वांची जाणीव हे गाणे करून देत आहे. प्रियांकाच्या आवाजातील आर्तता या गाण्याचे सौंदर्य आणखीनच खुलवत आहे. प्रियांका चोप्राचे तिच्या बाबांसोबत एक खास नाते होते. त्यांच्या निधनानंतर बराच काळ प्रियांकाला त्यांची कमतरताही भासली होती. आपल्या वडिलांचा कार्यक्रमादरम्यान वारंवार उल्लेख करताना अनेकांना माहित आहे.

प्रियांका चोप्रा व तिची आई मधू चोप्रा यांच्या ‘पर्पल पिक्चर’ निर्मित ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी नावे एकाच वेळी पडद्यावर पाहण्याची संधी ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटातून मिळणार आहे. या चित्रपटात निखिल रत्नपारखी, राहुल सोलापूरकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अच्युत पोद्दार, विजू खोटे, सुलभा आर्या, स्वाती चिटणीस या सगळ्यांबरोबरआशुतोष गोवारिकर 18 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर मराठी चित्रपटाता अभिनेता म्हणून पुनरागमन करीत आहे. 

Web Title: Priyanka's 'Ventilator' reminds me of Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.