प्रियांकाला मिळाला तेजस्वीनी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 14:56 IST2016-10-03T09:26:21+5:302016-10-03T14:56:21+5:30

                     मराठी इंडस्ट्रीतील सध्याची आघाडीची गायिका म्हणून प्रियांका बर्वेकडे पाहिले ...

Priyanka received Tejaswini Award | प्रियांकाला मिळाला तेजस्वीनी पुरस्कार

प्रियांकाला मिळाला तेजस्वीनी पुरस्कार

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
                   मराठी इंडस्ट्रीतील सध्याची आघाडीची गायिका म्हणून प्रियांका बर्वेकडे पाहिले जाते. प्रियांकाने कमी वेळात मराठी चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट गाणी देऊन प्रेक्षकांच्या मनात आपली जागा तयार केली आहे. नुकताच तिला पुणे नवरात्र महिला महोत्सवातील तेजस्वीनी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. सोशलमीडियावर तिने पुरस्कारासोबतचा फोटो अपलोड केला आहे.  या फोटोसोबत तिने पोस्ट देखील लिहिली आहे. 'मला तेजस्विनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला. ज्या ठिकाणी मी लहानाची मोठी झाले त्या परिसरात माझ्या कामाची दखल घेतली गेली ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे प्रियांकाने लिहिले आहे. अनेक आगामी मराठी चित्रपटात देखील आपल्याला प्रियांकाचा आवाज ऐकायला मिळणार आहे. 

            

Web Title: Priyanka received Tejaswini Award