प्रियंका चोपडाच्या दुसºया मराठी ‘फायरब्रॅण्ड’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:00 IST2018-01-09T13:29:35+5:302018-01-09T19:00:05+5:30

बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवित असलेली देसी गर्ल प्रियंका चोपडा हिचे मराठीबद्दलचे प्रेम कधीच लपून राहिले नाही. त्यामुळेच ‘व्हेंटिलेटर’च्या ...

Priyanka Chopra's second film 'Firebrand' starts shooting! | प्रियंका चोपडाच्या दुसºया मराठी ‘फायरब्रॅण्ड’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!

प्रियंका चोपडाच्या दुसºया मराठी ‘फायरब्रॅण्ड’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!

लिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवित असलेली देसी गर्ल प्रियंका चोपडा हिचे मराठीबद्दलचे प्रेम कधीच लपून राहिले नाही. त्यामुळेच ‘व्हेंटिलेटर’च्या यशानंतर प्रियंका पुन्हा एकदा मराठी चित्रपट घेऊन येत आहे. प्रियंका चोपडाच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत दुसºया ‘फायरब्रॅण्ड’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली असून, त्याचे एक पोस्टरही समोर आले आहे. प्रियंकाच्या होम प्रॉडक्शन पर्पल पेबल पिक्चर्सकडून आमच्या आगामी ‘फायरब्रॅण्ड’ या चित्रपटासोबत २०१८ चे स्वागत’ असे ट्विट करण्यात आले आहे. 
 }}}} ">2018 is here and we’ve hit the ground running with our new Marathi production #Firebrand directed by the amazing @aruraje which began filming yesterday. All the very best team @purplepebblepic@chopramadhu1@sandy_bhargavahttps://t.co/9VolJNxnoS— PRIYANKA (@priyankachopra) January 9, 2018
तर प्रियंकानेही एक ट्विट केले असून, त्यामध्ये लिहिले की, २०१८ या वर्षाला सुरुवात झाली असून, आम्ही उत्कृष्ट दिग्दर्शिका अरुणा राजे पाटील यांच्यासोबत आमच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रियंकाने ‘व्हेंटिलेटर’ या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मपुस्कर यांनी केले. या चित्रपटाला ६४ व्या राष्टÑीय पुरस्कार समारंभात तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शिवाय प्रेक्षकांनाही या चित्रपटाने भुरळ घातली. आता प्रियंकाचा ‘फायरब्रॅण्ड’ हा चित्रपट काय करिश्मा दाखविणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 



दरम्यान, प्रियंका सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच ती भारतात आली होती तेव्हा ती काही बॉलिवूड प्रोजेक्ट साइन करणार, अशी चर्चा होती. मात्र अद्यापपर्यंत प्रियंकाने एकाही बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. त्यामुळे देसी गर्ल प्रियंकाचे बॉलिवूडमध्ये जलवे बघण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, प्रियंकाने बॉलिवूड प्रोजेक्ट अगोदरच मराठी प्रोजेक्टला सुरुवात केल्याने, तिच्या चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला असेल, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 

Web Title: Priyanka Chopra's second film 'Firebrand' starts shooting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.