प्रियदर्शन जाधव रमला कॉलेजच्या आठवणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 15:35 IST2016-12-24T15:33:15+5:302016-12-24T15:35:48+5:30
प्रत्येक व्यक्ती हा कितीही मोठा झाला तरी तो आपल्या आठवणीत रमलेला दिसत असतो. या जर कॉलेज डे च्या आठवणी ...

प्रियदर्शन जाधव रमला कॉलेजच्या आठवणीत
प रत्येक व्यक्ती हा कितीही मोठा झाला तरी तो आपल्या आठवणीत रमलेला दिसत असतो. या जर कॉलेज डे च्या आठवणी असतील तर पुन्हा हे दिवस कधी परतणार याच प्रश्नांचा विचार व्यक्ती करत असतो. कारण प्रत्येकाला त्याच्या या आठवणी आनंदाचा क्षण साजरा करण्याच्या संधी देत असतात. म्हणून कॉलेजच्या आठवणी या मनाच्या अगदी जवळच्या कोपºयात विसावलेल्या असतात. अशाच कॉलेजच्या आठवणींमध्ये प्रेक्षकांचा लाडका अभिनेता प्रियदर्शन रमलेला दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्याने नुकतेच सोशलमीडियावर मित्रांसोबतचा कॉलेजचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये प्रि़यदर्शन आणि त्याचे काही मित्र डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तो आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतो, हा आमच्या नॅशनल कॅम्पचा फोटो आहे. या सर्वा मित्रांकडे पाहून विश्वासच बसत नाही की, आज इतके मोठे झालो आहोत. तसेच नाचो फ्रेंडस अशीदेखील कमेंन्ट त्याने दिली आहे. त्याच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव याने टाइमपास २, विजय असो, चिंटू २ असे अनेक चित्रपट केले आहेत. त्याचबरोबर त्याने नाटकाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. त्याचप्रमाणे शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेतूनदेखील हा अभिनेता पाहायला मिळाला. तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका दिल दोस्ती दुनियादारीमध्ये पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत तो पाहायला मिळाला. त्याने नेहमीच नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. तसेच तो सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे.
![]()