सई-प्रियाची गोड मैत्री; मुंबईत नवं घर घेतलेल्या मैत्रिणीसाठी केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:03 IST2023-09-24T15:02:05+5:302023-09-24T15:03:52+5:30
सईसाठी प्रिया बापटने एक खास पोस्ट केली आहे.

Priya Bapat - Sai Tamhankar
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांची मैत्री खास आहे. या दोन्ही अभिनेत्री एकमेकींसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. दोघींचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करताना प्रिया आणि सई एकमेकींचं कौतुक करताना थकत नाही. मुळची सांगलीची असलेल्या सईने मुंबईत स्वतःचं पहिलं घर घेतलं आहे. या घरात ती नुकतीच राहायला गेली. खऱ्या अर्थाने मुंबईकर झालेल्या सईसाठी प्रिया बापटने एक खास पोस्ट केली आहे.
प्रियाने सईच भरभरून कौतुक केलं आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलं की, "तुझं घर हे कठोर परिश्रम, प्रेम, जिव्हाळा आणि प्रचंड इच्छा शक्तीमधून बनल आहे. स्वप्ने, आकांक्षा, आशीर्वाद आणि महत्वाकांक्षेने ही जागा भरलेली आहे. तुझं नवं घर हे तुझंच मूर्त स्वरूप आहे. नव्या घरासाठी खूप खूप अभिनंदन आणि प्रेम सई".
सई आणि प्रिया दोघीही मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. असं असूनही त्यांच्यातील ही गोड मैत्री अनेकांसाठी आदर्श आहेत. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी 'वजनदार' आणि 'टाइम प्लीज' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. या दोन्ही सिनेमात सई-प्रियाचा अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. सई आणि प्रियाने हिंदी अभिनय क्षेत्रातही त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांच्या सिनेमा- वेबसीरिजसाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सई आणि प्रिया पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार या प्रतीक्षेत त्यांचे फॅन्स आहेत.