उमेश कामत अन प्रिया बापट ही आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील क्युट कपल जोडी ...
प्रिया म्हणते नेक्स्ट पण तुच......
r /> उमेश कामत अन प्रिया बापट ही आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील क्युट कपल जोडी म्हणुन ओळखली जाते. या दोघांनीही त्यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर दाखविलीच आहे. परंतू उमेश रिअल लाईफमध्ये सुद्धा प्रियाला सतत मदत करीत असतो असे तिनेच सांगितले असुन उमेश केअरिंग हजबंड असल्याचे त्याने प्रूव करुन दाखविले आहे. आता या कपल मध्ये सगळ गोडी गुलावीने सुरु असतानाच प्रियाने सोशलसाईट्सवर उमेशला नेक्स्ट पण तुच... आता सुटका नाही अशी कमेंट केली आहे. प्रियाने उमेशला असे म्हणण्यामागे तिचा काय हेतू असेल बरं. तर त्याचे झाले असे की फेसबुकवर सध्या सगळेच एका अॅपवर जाऊन अनेक गोष्टी चेक करीत असतात. तसेच काही केले आहे आपल्या प्रियाने तिने चक्क हु इज द नेक्ट पर्सन यु विल बी इन अ रिलेशनशिप विथ हीे गोष्ट चेक केली अन गंमत काय तर यामध्ये तिच्या नवºयाचेच म्हणजे उमेशचे नाव आले. अन मग काय प्रियाने अगदी गमतीने त्याला म्हटले आता सुटका नाही. ते काहीही असो प्रिया पण तुमचे सोशल साईट्सवरचे बंध देखील मजबुत अससल्याचेच यातून दिसुन येत आहे.