प्रियाने बनवला चीझकेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 16:21 IST2016-06-08T10:51:18+5:302016-06-08T16:21:18+5:30

         केक अन पेस्ट्रीज यांची नुसती नावे जरी काढली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. काहीजण तर ...

Priya made cheesecake | प्रियाने बनवला चीझकेक

प्रियाने बनवला चीझकेक


/>         केक अन पेस्ट्रीज यांची नुसती नावे जरी काढली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. काहीजण तर केक घरी बनविण्याची मजा घेतात. अन पाहिज्या त्या फ्लेवरचा आपल्या आवडीचा केक तयार करतात. आता असाच मस्त अगदी यम्मी केक मराठीची बबली गर्ल प्रिया बापटने बनविला आहे. प्रियाला केक बनवता येतो हे ऐकल्यावर तिच्या चाहत्यांच्या भुवया तर नक्कीच उंचावल्या असतील. परंतू प्रिया तिच्या रिअल लाईफमध्ये देखील मस्त स्वयपाक करते. तिला वेगवेगळ््या डीशेस बनवायला फार आवडतात. पुरणपोळ््या देखील ती एकदम छान करते. आता आपल्या या पठ्ठीने झक्कास असा केक बनवला आहे. अन तो केक साधासुधा नाही तर एकदमच डिलीशिअस असा ब्ल्युबेरी चीझकेक आहे. मस्तपैकी चीझ घालुन यम्मी केक प्रियाने नूकताच तयार केला होता. या केकचे फोटोज तिने सोशल साईट्सवर अपलोड केले असुन तिचा हा केक खुपच मस्त दिसत आहे. व्हाईट कलरची क्रिम अन चॉकलेट असे कॉम्बिनेशन असलेला हा चीझकेक पाहताक्षणी तोडांत घालावा असाच वाटत आहे. आता केक तयार केलाय म्हटल्यावर त्याला कारणही तसेच आहे. प्रियाच्या आगामी गच्ची या सिनेमाचे पॅकअप झाले अन त्या आनंदात तिने पार्टीसाठी हा स्पेशल केक स्वत: तयार केला. 

            

Web Title: Priya made cheesecake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.