अरेच्चा...! प्रिया बेर्डेंच्या घरी चक्क अ‍ॅलेक्सानं केली गणपतीची पूजा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 15:32 IST2019-09-03T15:32:16+5:302019-09-03T15:32:54+5:30

प्रिया बेर्डे यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने इंस्टाग्रामवर घरच्या गणपती बाप्पाचे फोटो शेअर केला आहे.

Priya Berde's Ganpati worship by Alexa, see photo | अरेच्चा...! प्रिया बेर्डेंच्या घरी चक्क अ‍ॅलेक्सानं केली गणपतीची पूजा, वाचा सविस्तर

अरेच्चा...! प्रिया बेर्डेंच्या घरी चक्क अ‍ॅलेक्सानं केली गणपतीची पूजा, वाचा सविस्तर

आज सगळीकडे गणरायाचे आगमन धुमधडाक्यात झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची आराधना सगळेच मनोभावे करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींकडे देखील आज बाप्पा विराजमान झाले असून अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या लाडक्या बाप्पाचे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच प्रिया बेर्डे यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने इंस्टाग्रामवर घरच्या गणपती बाप्पाचे फोटो शेअर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वानंदीनं इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या व्हिडिओत नक्की काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. 

स्वानंदीने गणेशाची प्रतिष्ठापना करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात अभिनय पूजा करतोय तर भटजीऐवजी अ‍ॅमेझॉनची व्हर्च्युअल असिस्टंट अ‍ॅलेक्सा प्रतिष्ठापनेचे मंत्र उच्चारत होती आणि त्याप्रमाणे अभिनय पूजा करत होता. 

प्रिया बेर्डे यांच्या घरच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी जयवंत वाडकर, देवेंद्र पेम यांचे कुटुंब आलं होतं. त्यांचेही फोटो इंस्टाग्रामवर पहायला मिळाले. 


स्वानंदी बेर्डे ही 'रिस्पेक्ट' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदी हिने या चित्रपटात साकारली आहे.

अभिनयपाठोपाठ आता त्याची बहीण स्वानंदीसुद्धा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या चित्रपटसृष्टीतील एंट्रीमुळे त्यांची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे या प्रचंड आनंदित आहेत.

Web Title: Priya Berde's Ganpati worship by Alexa, see photo