गर्मीमुळे हैराण झालात का? मग फॉलो करा अभिनेत्री प्रिया बापटचा समर लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 17:01 IST2021-03-24T16:59:03+5:302021-03-24T17:01:46+5:30
लोक वाढत्या उन्हामुळे हैराण झाले आहेत.

गर्मीमुळे हैराण झालात का? मग फॉलो करा अभिनेत्री प्रिया बापटचा समर लूक
गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या तडाख्याने घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता असते. लोक वाढत्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात अंगाली लाहीलाही होत असल्यामुळे लोक सूती कपड्यांना प्रधान्य देतात. अभिनेत्रीने प्रिया बापटने तिचा समर लूक चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रियाने या फोटोत शॉर्ट पँट आणि सूती पिस्ता कलरचा शर्ट परिधान केला आहे. तुम्हीही प्रियाचा हा समर लूक फॉलो करु शकता. प्रियाचा हा समर लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चाहत्यांना हा तिचा समर लूक आवडला आहे.
उमेश कामत आणि प्रिया बापटने १७ मार्च रोजी सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते.
उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती. याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे. तिने नुकतेच या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.