प्रिया बापट लाल रंगाच्या ड्रेसमधील झक्कास, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 14:15 IST2020-11-09T14:15:00+5:302020-11-09T14:15:02+5:30
हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.

प्रिया बापट लाल रंगाच्या ड्रेसमधील झक्कास, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.
प्रियाने इन्स्टाग्रामवर तिचा लाल रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट शेअर केले आहे. या फोटो प्रिया खूपच सुंदर दिसते आहे. 'हवा में उड़ता जायेमेरा लाल दुपट्टा मलमल का' असे या फोटोला प्रियाने कॅप्शन दिले आहे. प्रियाचे हे फोटो तिच्या फॅन्सना देखील आवडले आहे त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती दर्शवली आहे.
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.