प्रिया बापटने तिच्या टीमसोबत केली 'पावरी', हसत म्हणाली - 'हमारी पावरी हो रही है...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 13:29 IST2021-02-20T13:29:38+5:302021-02-20T13:29:58+5:30
प्रिया बापटने एका फोटोशूट दरम्यान तिच्या टीमसोबत पावरी व्हिडीओ बनवला आहे.

प्रिया बापटने तिच्या टीमसोबत केली 'पावरी', हसत म्हणाली - 'हमारी पावरी हो रही है...'
सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इंस्टा स्टार दानानीरचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पावरीच्या नावाने खूप लोकप्रिय झाला आहे. या व्हिडीओवर बॉलिवूडसोबत मराठी सेलिब्रेटीदेखील खूप रिएक्शन देत आहेत. आता प्रिया बापटने एका फोटोशूट दरम्यान तिच्या टीमसोबत पावरी व्हिडीओ बनवला आहे.
प्रिया बापटने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, जेव्हा काम पावरीसारखे वाटते तेव्हा.
या व्हिडीओत प्रिया बापट बोलते आहे की, ये मैं हूँ, ये मेरी टीम है और पार्टी हो रही है.. यात ती खूप हसताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच प्रिया बापट एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे. याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे. तिने नुकतेच या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.