पती उमेश कामत सोबत प्रिया बापट करतेय व्हॅकेश एन्जॉय, फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 21:01 IST2022-03-19T18:41:12+5:302022-03-19T21:01:37+5:30
विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सध्या प्रिया बापट पती उमेश कामतसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

पती उमेश कामत सोबत प्रिया बापट करतेय व्हॅकेश एन्जॉय, फोटो शेअर करत म्हणाली...
भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात.
अभिनेत्री प्रिया बापट पती उमेश कामतसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. सध्या उमेश आणि प्रिया सध्या कर्नाटकमधल्या हम्मीमध्ये फिरतायेत. दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हम्मीमधले फोटो शेअर केलंत. सकाळ अशी असावी, असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं. प्रिया आणि उमेशच्या चाहत्यांना त्यांचे हे फोटो आवडले आहे. विशेष म्हणजे दोघे रोड ट्रिपवर गेलेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. उमेश आणि प्रिया यांच्या वयात आठ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले.