चेहऱ्यावर सुरकुत्या, पातळ झालेले केस; मराठी अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणते- "३.३० तास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:18 IST2025-11-27T12:17:24+5:302025-11-27T12:18:06+5:30
सध्या मराठी अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीचा वेगळाच लूक दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत. त्यासोबतच तिचे केसही पातळ आणि पांढरे झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

चेहऱ्यावर सुरकुत्या, पातळ झालेले केस; मराठी अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, म्हणते- "३.३० तास..."
सध्या मराठी अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीचा वेगळाच लूक दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत. त्यासोबतच तिचे केसही पातळ आणि पांढरे झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया बापट आहे. प्रियाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'असंभव' या सिनेमातील हा लूक आहे.
प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'असंभव' सिनेमात प्रियाने दुहेरी भूमिका साकारली आहे. साधना सैगल हे पात्र तिने साकारलं आहे. या पात्राची ३५व्या वर्षातील तारुण्यपणातील भूमिका आणि ७५व्या वर्षी म्हातारपणीची भूमिका अशा दुहेरी भूमिकेत प्रिया सिनेमात दिसते. पण, हा लूक करण्यासाठी प्रियाला तब्बल ३.३० तास लागायचे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
"कलाकार म्हणून सतत नवीन काहीतरी करण्याची, शिकण्याची धडपड असते. आणि अशी संधी फार कमी वेळा मिळते की एखाद्या पात्राच्या वयाचे दोन महत्त्वाचे टप्पे पडद्यावर दाखवता येतात. “असंभव” या आत्ता चित्रपटगृहात चालू असलेल्या आमच्या चित्रपटात “साधना सैगल” म्हणून मला ह्या पात्राचे ३५ आणि ७५ वयही पडद्यावर साकारायला मिळाले. हा मेकअप करायला ३.३० तास लागायचे. या संपूर्ण अनुभवाासाठी सगळ्या टीमचे आभार", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'असंभव' सिनेमात प्रियासोबत मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २१ नोव्हेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.