एक शून्य तीन या नाटकाला सीआयडी टीमची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 16:23 IST2016-12-27T16:23:26+5:302016-12-27T16:23:26+5:30
मराठी चित्रपटांच्या मुहुर्तासाठी बॉलिवुडच्या तगडया कलाकारांची उपस्थितीदेखील मराठी चित्रपटांचे यशच म्हणता येईल. अशा या चित्रपटांप्रमाणेच नाटकालादेखील हिंदी कलाकारांची उपस्थिती पाहण्यास मिळत आहे. आता हेच पाहा ना, छोटया पडदयावर सर्वात सुपरहीट असलेली सीआयडी या मालिकेतील कलाकारांनी थेट मराठी रंगभूमी गाठली असल्याचे पाहायला मिळाले.
.jpg)
एक शून्य तीन या नाटकाला सीआयडी टीमची उपस्थिती
य दा मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०१६ हे वर्ष झक्कास गेले असल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी सैराट आणि नटसम्राट या चित्रपटांनी बॉक्सआॅफीसवर करोंडोचा गल्ला कमविला आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटसृष्टीत वेगवेगळया विषयांवरचे नाटकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाले. तसेच अनेक मराठी चित्रपटांच्या मुहुर्तासाठी बॉलिवुडच्या तगडया कलाकारांची उपस्थितीदेखील मराठी चित्रपटांचे यशच म्हणता येईल. अशा या चित्रपटांप्रमाणेच नाटकालादेखील हिंदी कलाकारांची उपस्थिती पाहण्यास मिळत आहे. आता हेच पाहा ना, छोटया पडदयावर सर्वात सुपरहीट असलेली सीआयडी या मालिकेतील कलाकारांनी थेट मराठी रंगभूमी गाठली असल्याचे पाहायला मिळाले. सीआयडीच्या टीमने एक शून्य तीन या नाटकाच्या कलाकारांना प्रत्यक्ष भेट दिली. तसेच त्यांनी नाटकदेखील पाहायले. सीआयडी टीमने या नाटकाच्या टीमल भेट दिल्याचा व्हिडीओ अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने नुकताच सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अभिनेता शिवाजी साटम सांगतात की, हे रहस्यमय नाटक खूपच छान आहे. तसेच मराठी रंगभूमीवर सातत्याने विविध विषय असलेले नाटक रंगभूमीवर पाहायला मिळते. त्याचबरोबर एक शून्य तीन हे रहस्यमय नाटकदेखील खूपच वेगळया ज्वानरचे नाटक आहे. त्याचप्रमाणे स्वानंदीने सीआयडी टीमसोबतचा एक फोटो ही सोशलमीडियावर अपलोड केला आहे. या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक दिग्दर्शित एक शून्य तीन हे नाटक आहे. रहस्यमय आणि थरारक असे हे नाटक आहे. या नाटकात अभिनेता सुमीत राघवन पत्रकार आणि रिसर्चरच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री स्वानंदी टिकेकरदेखील या नाटकात पाहायला मिळत आहे. स्वानंदी हिने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
{{{{twitter_video_id####
{{{{twitter_video_id####
}}}}Ek shoonya teen team with CID team@sumrag@TikekarSwanandipic.twitter.com/coWrWUvMqJ— EkShoonyaTeen (@EkShoonyaTeen) December 26, 2016