एकवेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं अशक्य! 'प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:38 IST2025-10-06T16:36:48+5:302025-10-06T16:38:25+5:30

'प्रेमाची गोष्ट २' सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झाला आहे. ललित प्रभाकर, भाऊ कदम या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलंय

premachi goshta 2 trailer starring lalit prabhakar bhau kadam rucha vaidya ridhima pandit | एकवेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं अशक्य! 'प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर

एकवेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं अशक्य! 'प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ललित प्रभाकर, स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचा ट्रेलर खूप खास आहे.

‘प्रेमाची गोष्ट २’चा ट्रेलर

सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट २’ च्या ट्रेलरमध्ये एक खास गोष्ट दिसतेय. ललित प्रभाकरचं ऋचा वैद्यसोबत लग्न ठरतं. ऋचाचे वडील त्याला नोकरीलाही लावतात. आधी मैत्रीण असलेली मुलगी नंतर बायको होते. दोघे लग्नानंतर आनंदी असतात. परंतु हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. अशातच ललितच्या आयुष्यात त्याच्या बालपणीची क्रश समोर येते. त्यामुळे ललित बायकोला सोडून तिच्यासोबत वेळ घालवतो. ललितची बायको त्या दोघांना रंगेहाथ पकडते, त्यामुळे त्यांचं जोरदार भांडण होतं. 


पुढे ललितला भेटायला थेट स्वर्गातून दोन माणसं येतात. ती माणसं म्हणजे स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम. स्वप्नील-भाऊकडून ललितला नशीब बदलण्याची एक संधी दिली जाते, मग पुढे काय होतं? हे सिनेमा आल्यावरच पाहायला मिळेल. ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title : दोस्त पत्नी हो सकती है, लेकिन पत्नी दोस्त नहीं: 'प्रेमाची गोष्ट 2'

Web Summary : 'प्रेमाची गोष्ट 2' का ट्रेलर प्रेम कहानी और अरेंज मैरिज दिखाता है। ललित का किरदार वैवाहिक मुद्दों का सामना करता है और उसे भाग्य बदलने का मौका मिलता है। फिल्म 21 अक्टूबर को रिलीज होगी।

Web Title : Friend can be wife, but not vice versa: 'Premachi Goshta 2'

Web Summary : 'Premachi Goshta 2' trailer reveals a love story with arranged marriage. Lalit's character faces marital issues and temptation, offered a chance to change fate. The movie releases October 21st.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.