'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाविषयी प्रविण तरडेंची पोस्ट; म्हणाले, 'तडाखेबंद चित्रपट...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:13 PM2024-03-26T15:13:08+5:302024-03-26T15:13:51+5:30

Pravin tarde: स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाविषयी प्रविण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया

pravin-tarde-shared-post-after-watching-randeep-hooda-s-swatantra-veer-savarkar-movie | 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाविषयी प्रविण तरडेंची पोस्ट; म्हणाले, 'तडाखेबंद चित्रपट...'

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाविषयी प्रविण तरडेंची पोस्ट; म्हणाले, 'तडाखेबंद चित्रपट...'

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (randeep hooda) याचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. अनेकांनी या सिनेमाविषयी भाष्य केलं असून अनेक कलाकारांनीदेखील हा सिनेमा पाहण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. यामध्येच आता अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या सिनेमाविषयी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाच्या माध्यमातून रणदीप हुड्डा याने दिग्दर्शकीय क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. त्यामुळे तो सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. यामध्येच  प्रविण तरडे ( pravin tarde) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत रणदीप आणि या सिनेमाचं कौतुक केलं आहे.

काय आहे प्रविण तरडे यांची पोस्ट?

प्रविण तरडे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. सोबतच कॅप्शन देत त्यांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. "॥धर्मो रक्षिती रक्षित:॥ अफाट अचाट आयुष्य जगलेल्या, जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या, महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं, ताबडतोब बघावा असा तडाखेबंद चित्रपट,"  असं म्हणत प्रविण तरडे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने जवळपास ९ लाख ६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Web Title: pravin-tarde-shared-post-after-watching-randeep-hooda-s-swatantra-veer-savarkar-movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.