प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 11:40 IST2024-02-22T11:40:01+5:302024-02-22T11:40:35+5:30

Prathmesh Parab Wedding : क्षितीजाच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहेंदी! फोटोंनी वेधलं लक्ष

prathmesh parab wedding kshitija ghosalkar mehendi ceremony photos viral | प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष

प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रथमेश क्षितीजा घोसाळकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नाला आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. त्या दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू असून लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. क्षितीजा आणि प्रथमेशची लगीनघाई सुरू आहे. 

नुकताच क्षितीजाचा मेहेंदीसोहळा पार पडला. क्षितीजाच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहेंदी रंगली आहे. क्षितीजाने मेहेंदीचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मेहेंदी सोहळ्यासाठी क्षितीजाने खास हिरव्या रंगचा ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने फ्लोरल ज्वेलरीही घातली होती. क्षितीजाच्या मेहेंदीचं डिझाईनही फारच खास आहे. तिने हातावर नवरा-नवरी काढले आहेत. तर प्रतिजा असा हॅशटॅगही तिने मेहेंदीमध्ये लिहिला आहे. तिच्या सुंदर मेहेंदीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेहेंदीबरोबरच क्षितीजाच्या कानातल्यांचीही चर्चा रंगली आहे. क्षितीजाने प्रथमेशची पराजू असे लिहिलेले कानातलेही घातले होते. 

काही वर्ष डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितीजाने लग्नाच्या बेडीत अडकून आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. १४ फेब्रुवारीला त्यांचा साखरपुडा पार पडला. आता येत्या २४ तारखेला ते विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतंच प्रथमेशचा हळदी सोहळा पार पडला. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. 

Web Title: prathmesh parab wedding kshitija ghosalkar mehendi ceremony photos viral