प्रार्थना बेहरे व अनिकेत विश्वासराव पुन्हा एकत्र दिसणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 07:15 IST2018-09-17T11:09:52+5:302018-09-18T07:15:00+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे व चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव यांनी 'मस्का' चित्रपटात काम केल्यानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Prathana Behare and Aniket Vishwasrao will be together again | प्रार्थना बेहरे व अनिकेत विश्वासराव पुन्हा एकत्र दिसणार ह्या सिनेमात

प्रार्थना बेहरे व अनिकेत विश्वासराव पुन्हा एकत्र दिसणार ह्या सिनेमात

ठळक मुद्दे 'अबलख' चित्रपटात झळकणार अनिकेत व प्रार्थना

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे व चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव यांनी मस्का चित्रपटात काम केल्यानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोघे 'अबलख' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

स्वप्ने माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. अशाच स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा 'अबलख' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आनंद शिवाजी चव्हाण दिग्दर्शित या सिनेमात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मस्का' सिनेमानंतर अनिकेत आणि प्रार्थनाचा हा दुसरा सिनेमा आहे. मस्का सिनेमातील या दोघांचे काम प्रेक्षकांना चांगलेच भावले होते.
आयुष्य हा एक प्रवास असून या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे, असा संदेश अबलख या सिनेमातून देण्यात आला आहे. या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही या सिनेमात मांडण्यात आले आहे. ऑक्टोबरपासून या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. मैत्री, प्रेम आणि आयुष्यावर आधारलेल्या अनेक संकल्पनांना विविध पद्धतीने मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती श्री तुळजाभवानी प्रसन्न फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे.  
'अबलख' या चित्रपटात प्रार्थना व अनिकेत यांच्या भूमिकेबद्दल अद्याप समजलेले नाही. मात्र या जोडीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: Prathana Behare and Aniket Vishwasrao will be together again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.