गृहप्रवेशाच्या वेळी क्षितीजाने वाचली प्रथमेशच्या सिनेमांची बाराखडी; ऐका तिचा फिल्मी स्टाइल उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:34 IST2024-02-27T13:33:50+5:302024-02-27T13:34:43+5:30

क्षितीजाने प्रथमेशसाठी घेतलेला लग्नातला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय (prathamesh parab)

prathamesh parab wife Kshitija ghosalkar ukhana video viral | गृहप्रवेशाच्या वेळी क्षितीजाने वाचली प्रथमेशच्या सिनेमांची बाराखडी; ऐका तिचा फिल्मी स्टाइल उखाणा

गृहप्रवेशाच्या वेळी क्षितीजाने वाचली प्रथमेशच्या सिनेमांची बाराखडी; ऐका तिचा फिल्मी स्टाइल उखाणा

प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांनी २४ फेब्रुवारीला एकमेकांशी थाटामाटात लग्न केलं. प्रथमेश - क्षितीजीच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हि़डीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अशातच लग्नानंतर गृहप्रवेश करताना प्रथमेशची बायको क्षितीजाने घेतलेला धमाल उखाणा व्हिडीओ समोर आलाय. उखाणा घेताना क्षितीजाने प्रथमेशच्या सिनेमांची बाराखडी वाचली. 

क्षितीजाने उखाणा घेतला की... 'हृदयी वसंत फुलताना' वाढला होता थोडासा 'बीपी'
'डॉक्टर डॉक्टर' बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा डीपी 
प्रेम आमचं खरंय, नाही थिल्लर 'टाईमपास'
प्रेमाच्या परीक्षेत दोघांनी मिळवले 100 % नाही झालं कोणी '35 % काठावर पास'
जोडी आमची 'टकाटक' आहे एक नंबर
'खिचीक खिचीक' करत लोकंही काढतात फोटो शंभर
'ढीशक्याव' धूमधडाक्यात पडला होता पार साखरपुडा
मेहंदीच्या दिवशी 'डिलिव्हरी बॉय'ने आणून दिला सौभाग्याचं चुडा
लग्नही झालं आज थाटामाटात झालो आम्ही 'उर्फी'
आयुष्यभर एकमेकांना भरवू आनंदाने बर्फी
आता महत्वाचं, प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची प्रेक्षकांच्या मनावर आहे गोड जरब
आता माझीही नव्याने ओळख करून देते सौ. क्षितिजा प्रथमेश परब.

क्षितीजाने घेतलेल्या या उखाण्याचंं प्रथमेशनेही चांगलंच कौतुक केलं. बायकोने घेतलेला हा उखाणा ऐकताच त्याचीही बोलती बंद झाली. प्रथमेश - क्षितीजा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर त्यांंनी २४ फेब्रुवारीला थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं. 

Web Title: prathamesh parab wife Kshitija ghosalkar ukhana video viral