...अन् लग्नानंतर भर मांडवात प्रथमेश परब बायकोच्या पाया पडला, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 16:46 IST2024-02-24T16:45:35+5:302024-02-24T16:46:03+5:30

Prathamesh Parab Wedding : गळ्यात हार घातला, बायकोच्या पाया पडला अन्...; प्रथमेशच्या 'त्या' कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक

prathamesh parab touches feet of wife kshitija ghosalkar after wedding video viral | ...अन् लग्नानंतर भर मांडवात प्रथमेश परब बायकोच्या पाया पडला, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव

...अन् लग्नानंतर भर मांडवात प्रथमेश परब बायकोच्या पाया पडला, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव

महाराष्ट्राचा लाडका दगडू नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेता प्रथमेश परबने क्षितीजा घोसाळकरशी विवाह करत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सात फेरे घेत प्रथमेश आणि क्षितीजा लग्नाच्या बेडीत अडकले. त्याच्या लग्नातील फोटो व्हायरल झाले आहेत. तर प्रथमेश आणि  क्षितीजाचा लग्नातील एका गोड क्षणाचा व्हिडिओही समोर आला आहे. 

मोठ्या धुमधडाक्यात प्रथमेश आणि क्षितीजाचं लग्न पार पडलं. लग्नात प्रथमेशला हार घातल्यानंतर क्षितीजा त्याच्या पाया पडली. प्रथमेशनेही मोठ्या प्रेमाने तिला डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिले. पण, त्यानंतर अभिनेत्याच्या कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. क्षितीजा पाया पडल्यानंतर प्रथमेशनेही तिला हार घातला. त्यानंतर भर मांडवातच सगळ्यांसमोर प्रथमेश क्षितीजाचा मान ठेवत तिच्या पाया पडला. त्याच्या या कृतीने चाहते भारावून गेले आहेत. त्याच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

लग्नासाठी प्रथमेशने गुलाबी रंगाचं धोतर नेसून त्यावर पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि फेटा घातला होता. तर पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत नवी नवरी क्षितीजाचं सौंदर्य खुलून आलं होतं. प्रथमेश आणि क्षितीजाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर १४ फेब्रुवारीला त्यांनी साखरपुडा केला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी कायम सोबत राहण्याचं वचन एकमेकांना दिलं आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांची प्रेमकहानी खुलली होती. आता ते एकमेकांचे आयुष्यभराचे सोबती झाले आहेत. 
 

Web Title: prathamesh parab touches feet of wife kshitija ghosalkar after wedding video viral