शाहरुख खानच्या 'या' गाजलेल्या गाण्यावर प्रथमेश - क्षितीजाचा लग्नाातील डान्स व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 12:00 IST2024-02-25T11:57:39+5:302024-02-25T12:00:30+5:30

प्रथमेश परब - क्षितीजा घोसाळकरचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय (Prathamesh Parab Wedding)

Prathamesh parab Kshitija ghosalkar romantic wedding dance viral | शाहरुख खानच्या 'या' गाजलेल्या गाण्यावर प्रथमेश - क्षितीजाचा लग्नाातील डान्स व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानच्या 'या' गाजलेल्या गाण्यावर प्रथमेश - क्षितीजाचा लग्नाातील डान्स व्हिडीओ व्हायरल

प्रथमेश परब - क्षितीजा घोसाळकर (Prathamesh Parab) यांनी काल २४ फेब्रुवारीला एकमेकांशी थाटामाटात लग्न केलं. प्रथमेश - क्षितीजाच्या लग्नाचे अनेक फोटो - व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांच्या पारंपरिक लग्नाच्या फोटोंना सर्वांनी पसंती दिली आहे. प्रथमेश - क्षितीजाच्या (Kshitija Ghosalkar) लग्नातल्या रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत प्रथमेश त्याच्याच 'टाईमपास' सिनेमातील 'मला वेड लागले प्रेमाचे' गाण्यावर डान्स करताना दिसतोय. 

प्रथमेश -  क्षितीजा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले. यातील एका व्हिडीओत प्रथमेश - क्षितीजा शाहरुखच्या गाण्यांवर डान्स करत आहेत. 'तुमसे मिलके दिलका है जो हाल क्या कहे', या गाण्यावर प्रथमेश - क्षितीजा तुफान नाचले. याशिवाय प्रथमेशने पुढे त्याच्याच 'टाईमपास' सिनेमातील 'मला वेड  लागले प्रेमाचे' या गाण्यावर क्षितीजासोबत धम्माल डान्स केला. क्षितीजानेही प्रथमेशला चांगली साथ दिली.

प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजासोबत काल २४ फेब्रुवारीला मित्र-मैत्रीण अन् नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. प्रथमेश - क्षितीजाच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. सर्वांनी प्रथमेश - क्षितीजाला लग्नाच्या शुभेच्छा देऊन त्यांना आशिर्वाद दिले.

Web Title: Prathamesh parab Kshitija ghosalkar romantic wedding dance viral