प्रथमेश परबच्या साखरपुड्याची अंगठी पाहिलीत का? तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 18:02 IST2024-02-15T18:01:29+5:302024-02-15T18:02:23+5:30

प्रथमेश आणि क्षितिजाच्या अंगठीतील अनोख्या डिझाइनने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Engagement Special Ring Photos Grabs Attention Ring Design | प्रथमेश परबच्या साखरपुड्याची अंगठी पाहिलीत का? तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

प्रथमेश परबच्या साखरपुड्याची अंगठी पाहिलीत का? तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

'टाइमपास' सिनेमातला दगडू म्हणजेच प्रथमेश परबची सध्या लगीनघाई सुरू आहे. प्रथमेश लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर प्रथमेश परब याने क्षितीजा घोसाळकर हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.  सोहळ्यातील काही खास फोटो अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या साखरपुड्यातील अंगठीची  चर्चा सगळीकडे सुरू आहे. प्रथमेश आणि क्षितिजाच्या अंगठीतील अनोख्या डिझाइनने सर्वांच लक्ष वेधलं आहे. 

प्रथमेश आणि क्षितिजा यांनी साखरपुड्यात एकमेंकाना अंगठी घालताना पारंपरिक लूक केला होता. प्रथमेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी साडी नेसली होती. तर डान्स करताना व केक कापताना त्यांनी लाइट पिंक रंगाचा वेस्टर्न लूक केला होता. यावेळी  या जोडीने त्यांची एंग्जेमेंट रिंग फ्लॉण्ट केली. दोघांच्या अंगठ्या पाहायला मिळत आहे. त्यांच्या अंगठीचं डिझाइन सारखं आहे.  या अंगठीवर प्रथमेशच्या इंग्रजी नावानुसार 'P' हे अक्षर, तर क्षितिजाच्या नावातील 'केK हे अक्षर या दोन्ही अक्षरांची झलक 'KP' त्यांच्या अंगठीमध्ये पाहायला मिळत आहे.


आता त्याच्या लग्नाची तारीखदेखील समोर आली आहे. ते २४ फेब्रुवारी, २०२४ ला बोहल्यावर चढणार आहे. प्रथमेश परब हिने इंस्टाग्रामवर लग्नाची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.  या पोस्टमध्ये त्याने तारखेची बेरीज केली आहे. त्यातून इन्फिनिटी (अनंत) बनले आहे.  त्यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यांच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

Web Title: Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Engagement Special Ring Photos Grabs Attention Ring Design