"मुलगा असूनही 'बाप' झालास", मुलाने BMW कार भेट केल्यावर भावुक झाला प्रसाद ओक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:01 IST2024-09-04T11:59:47+5:302024-09-04T12:01:21+5:30

प्रसादच्या घरी नवी गाडी आली आहे. विशेष म्हणजे ही गाडी प्रसादने खरेदी केली नसून त्याच्या मुलाने त्याला गिफ्ट केली आहे.

prasad oak son sarthak gifted him New lavish bmw car actor shares special Video | "मुलगा असूनही 'बाप' झालास", मुलाने BMW कार भेट केल्यावर भावुक झाला प्रसाद ओक

"मुलगा असूनही 'बाप' झालास", मुलाने BMW कार भेट केल्यावर भावुक झाला प्रसाद ओक

Prasad Oak : प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता व दिग्दर्शक आहे. प्रसादा हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नुकतंच प्रसादने एक अतिशय खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसादच्या घरी नवी गाडी आली आहे. विशेष म्हणजे ही गाडी प्रसादने खरेदी केली नसून त्याच्या मुलाने त्याला गिफ्ट केली आहे. आपल्या लेकाचा अत्यंत अभिमान वाटत असल्याचं म्हणत त्याने एक व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांना सार्थक आणि मयंक ही दोन मुले आहेत.  सार्थक आणि मयंक हे दोघेही प्रसिद्धीपासून दूर असतात. यापैकी प्रसादचा मोठा मुलगा सार्थकने  स्वत:च्या वाढदिवशी वडिलांना गाडी भेट म्हणून दिली आहे. इतक्या कमी वयात लाडक्या लेकाने केलेली प्रगती पाहून प्रसाद भारावल्याचं पाहायला मिळालं. 

प्रसादने सोशल मीडियावर गाडीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, "सार्थक…मुलगा असूनही "बाप" झालास. अत्यंत अभिमान वाटतो तुझा…!!! देव कायम तुझ्या पाठीशी राहो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना…!!! वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!!! खूप खूप खूप प्रेम". प्रसादच्या या पोस्टवर अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, गौरव मोरे यांच्यासह इतर कलाकारांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. 


प्रसादचा लाडका लेक सार्थकबद्दल बोलायचं झालं तर त्याने  जर्मनीत शिक्षण घेतलं आहे. काही दिवसांपुर्वीच त्याचा पदवी प्रदान समारंभ झाला होता. या समारंभासाठी प्रसाद ओक पत्नी मंजिरी (Manjiri Oak) आणि धाकटा मुलगा मयांकसह पोहोचले होते. प्रसादच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'धर्मवीर २' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: prasad oak son sarthak gifted him New lavish bmw car actor shares special Video