प्रार्थना बेहरे म्हणते तू ही रे माझा मितवा, पतीसह सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटोला मिळते अधिक पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 10:14 IST2018-12-30T10:09:37+5:302018-12-30T10:14:07+5:30
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर लवकरच नवी इनिंग सुरु करणार आहे.अभिषेक लवकरच मराठी सिनेमात अभिनेता म्हणून झळकणार आहे.

प्रार्थना बेहरे म्हणते तू ही रे माझा मितवा, पतीसह सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटोला मिळते अधिक पसंती
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. रेशीमगाठीत अडकण्याआधी प्रार्थना आणि अभिषेक खूप चांगले मित्र होते. त्यामुळंच की त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.
मितवा फेम अभिनेत्री प्रार्थनाने नुकताच थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये हे कपल बोटीतून समुद्रसौंदर्य डोळ्यात साठवत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुझ्या कवेत असलं की सुरक्षित घरी असल्यासारखं वाटतं असं तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे. पती पत्नीचे नातं कसं असावं हेच जणू प्रार्थना या फोटोमधू सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर लवकरच नवी इनिंग सुरु करणार आहे.अभिषेक लवकरच मराठी सिनेमात अभिनेता म्हणून झळकणार आहे. पतीच्या पहिल्यावहिल्या सिनेमाची आणि अभिनयातील नवी इनिंगची माहिती खुद्द प्रार्थनाने दिली आहे. 'ग्रे' या आगामी मराठी सिनेमातून अभिषेक रसिकांच्या भेटीला येणार आहे. वैभव तत्त्ववादीचा फोटो असलेले सिनेमाचे पोस्टर प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. २०१९ साली हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल. या सिनेमात अभिषेक जावकरसह अभिनेता वैभव तत्त्ववादी, पल्लवी पाटील आणि मयुरी देशमुख यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.